

Panvel Water Supply Cut
ESakal
पनवेल : आगामी उन्हाळ्यात पनवेल शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेने सोमवार (ता. २३) पासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी २५ मेपासून हा निर्णय लागू केला होता; मात्र यंदा जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी हिवाळ्यातच ही कपात सुरू करण्यात आली आहे.