esakal | पनवेल महापालिकेचा सुशोभीकरणावर भर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पनवेल महापालिकेचा सुशोभीकरणावर भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : पनवेल (Panvel) महापालिकेच्या स्थापनेला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या पाच वर्षांत नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी पालिकेकडून (Municipal) विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. काही कामे पूर्ण झालीत, तर काही प्रगतिपथावर आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहराची महानगराकडे वाटचाल सुरू आहे.

आयुक्त गणेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना सोयी-सुविधा देण्याबरोबरच शहराचे सुशोभीकरण आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता या मूलभूत सुविधांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, वडाळा तलाव अशा विविध स्थळांच्या सुशोभीकरणावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. सध्या कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात असून संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, पुढील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असल्याचे महापालिकेकडन

हेही वाचा: नंदुरबार जिल्ह्यात मातृवंदना योजनेंतर्गत ३३ हजार महिलांना लाभ

पाणीपुरवठा योजना

शहरात पालिकेमार्फत २४ कोटी रुपये खर्चून अमृत योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे. तर एक कोटी आठ लाख खर्च करून मौजे कोपरा खारघर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. महापालिका क्षेत्रातील गावात १३.८० लाख रुपये करून आरओ प्लान्ट बसविले असून १९.७१ लाख रुपये खर्चून कूपनलिकांवर नॉन इलेक्ट्रीक वॉटर डिसइन्फेक्शन युनिट बसविण्यात आले आहेत.

loading image
go to top