Sakal Impact : ओवे कॅम्पची तहान मिटणार; नवीन जलवाहिनी जोडणीचे काम सुरू | Panvel Municipal corporation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal-Impact

Sakal Impact : ओवे कॅम्पची तहान मिटणार; नवीन जलवाहिनी जोडणीचे काम सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खारघर : पनवेल महापालिकेकडून (panvel municipal corporation) ओवे कॅम्प गावात (owe camp village) नवीन जलवाहिनी (new water pipeline) टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनी जोडणीचे काम सुरू झाल्याने पाणी समस्या दूर (no water scarcity) होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे.

हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलिसांवर हल्ला; झारखंडमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

कोयना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने स्थलांतर करताना सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले. आज खारघर वसाहतीत नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत असताना कोयना प्रकल्पग्रस्त, ओवे कॅम्प गावात मात्र नागरिकांना पाणी, रस्ते, वीज अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 'ओवे कॅम्पवासीय दुर्लक्षित' या मथळ्याखाली सकाळच्या अंकात १९ ऑक्टोबरला बातमी प्रसिद्ध झाली होती. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पनवेल पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या परिसराची पाहणी केली.

त्या वेळी त्यांना गावात जाणारी जलवाहिनी कमी व्यासाची आणि जीर्ण झाल्याने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पालिकेच्या माध्यमातून टाटा हॉस्पिटल येथील सिडकोच्या जलवाहिनीतून ओवे कॅम्प गावातील जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिनीच्या जागी नवीन टाकण्याचे काम हाती घेतल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे. याविषयी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात विचारणा केली असता, जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून पाणी गळती होत होती. त्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नसे. नवीन जलवाहिनीमुळे ओवे कॅम्प गावातील पाणी समस्या दूर होणार आहे.

"पनवेल पालिकेकडून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यापुढे गावात मुबलक पाणीपुरवठा होईल असे वाटते."

- रमेश जाधव, ग्रामस्थ, ओवे कॅम्प

loading image
go to top