Panvel Temperature : पनवेलमध्ये रखरखत्या उन्हातही खासगी शाळा भरताहेत दुपारीच: विद्यार्थ्यांचे हाल; पारा चाळिशीच्या जवळ

पारा चाळिशीच्या जवळ पोहोचला तरी शाळा दुपारच्याच सत्रात भरविल्या जात असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाचे चटके सोसत शाळेत जावे लागते व घामाच्या धारा पुसत वर्गात बसावे लागत आहे.
Private schools in Panvel are continuing to hold classes during the scorching afternoon heat, with temperatures rising above 40°C, causing hardships for students.
Private schools in Panvel are continuing to hold classes during the scorching afternoon heat, with temperatures rising above 40°C, causing hardships for students.sakal
Updated on

पनवेल : उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू केल्या आहेत; परंतु या निर्णयाचा तालुक्यातील काही खासगी शिक्षण संस्था व शाळांना विसर पडलेला दिसतो. पारा चाळिशीच्या जवळ पोहोचला तरी शाळा दुपारच्याच सत्रात भरविल्या जात असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाचे चटके सोसत शाळेत जावे लागते व घामाच्या धारा पुसत वर्गात बसावे लागत असल्याची खंत काही विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com