esakal | पनवेल : ठाण्याच्या सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

पनवेल : ठाण्याच्या सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करताना ठाणे (Thane) महापालिकेच्या (Municipal) सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर अमरजीत यादव (Amarjit Yadav) या फेरीवाल्याने (peddler) तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पनवेल (Panvel) महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) यांना निवेदन दिले.

या भ्‍याड हल्ल्याविरोधात संघटित निषेध करण्यासाठी मंगळवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी (officers and employees) काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले. याप्रसंगी उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार सहायक आयुक्त धैर्यशील जाधव आणि मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अनिल जाधव, शैलेश गायकवाड, सुनील मानकामे आदी उपस्थित होत्या.

  • उरणमध्ये एकदिवस कामबंद

उरण : ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पना पिंगळे यांच्यावर झालेल्‍या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उरण नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून मंगळवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले.

याप्रकरणी जलद गतीने खटला चालवून आरोपीला लवकरात लवकर व जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हे निवेदन उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र बुधवंत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनाही दिल

loading image
go to top