MP Balya Mama Mhatre : माझ्या खासदारकीच्या विजयात पप्पू कालानींचा सिंहाचा वाटा; बाळ्या मामांनी दिली कबूली

पप्पू कालानी यांनी 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त गोलमैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बाळ्या मामा म्हात्रे यांनी उपस्थिती लावली.
mp balya mama mhatre
mp balya mama mhatresakal
Updated on: 

उल्हासनगर - माजी आमदार पप्पू कालानी आणि त्यांच्या टीमचा माझ्या खासदारकीच्या विजयात सिंहाचा वाटा असल्याची कबूली भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी उल्हासनगरात दिली आहे.

पप्पू कालानी यांनी 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त गोलमैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बाळ्या मामा म्हात्रे यांनी उपस्थिती लावली. तेव्हा त्यांनी पप्पू कालानी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करून कालानी यांनी त्यांच्या कालावधीत केलेल्या विकासकामांना तोड नसल्याचे सांगितले.

Loading content, please wait...