esakal | परमबीर सिंह यांना तात्पुरता दिलासा ; मुंबई पोलिसांची हायकोर्टात माहिती | Parambir singh
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir Singh

परमबीर सिंह यांना तात्पुरता दिलासा ; मुंबई पोलिसांची हायकोर्टात माहिती

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल झालेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांच्यावर ता. 21 पर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसांनी (mumbai police) आज मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) दिली.

हेही वाचा: घटस्थापनेपासून मंदिरं उघडणार; मुंबईकरांना मात्र 'हा' नियम लागू

सिंह यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे असे गुरुवारी गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. सिंह देश सोडून फरार झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ठाणे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी सिंह यांच्या विरोधात अॅट्रोसिटी आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी याचिका केली आहे.

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या वरही ता 21 पर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, असे आज सरकारी वकील जयेशा याज्ञिक यांनी न्यायालयात सांगितले. शुक्ला यांनी फोन टॅपिंग प्रकरणात स्वतंत्र याचिका केली आहे. त्यांनी गोपनीयता कायद्याचा भंग करून महत्त्वाचा सरकारी अहवाल खुला केला असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे.

न्या एस एस शिंदे आणि न्या एन जे जमादार यांच्या खंडपीठाने या दोन्ही याचिकांवर ता 20 रोजी सुनावणी निश्चित केली. सरकारी वकिलांनी केलेले विधान खंडपीठाने नोंदवून घेतले आहे. सिंह मागील कित्येक दिवसांपासून पोलिसांना मिळत नसून आता ते देशाबाहेर गेल्याची शक्यता राज्य सरकारकडून वर्तविण्यात येत आहे. एका प्रकरणात पोलीस तक्रारीत होत असलेला तपास थांबविण्यासाठी सिंह यांनी छळ केला असा आरोप घाडगे यांनी केला आहे.

loading image
go to top