परमबीर सिंहांनी दहशतवाद्यांना केली मदत; शमशेर पठाण यांचा आरोप | Parambir singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir Singh

परमबीर सिंहांनी दहशतवाद्यांना केली मदत; शमशेर पठाण यांचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 26/11 च्या हल्यानंतर परमबीर सिंह (Parambir singh) यांनी दहशतवाद्यांना मदत (helps terrorist) केली असा आरोप मुंबईचे निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण (samsher khan pathan) यांनी केलाय. मुंबई पोलिस आयुक्ताांना (letter to Mumbai police commissioner) पत्र लिहून त्यांनी ही गोष्ट कळवली. त्यांच्या पत्रात त्यांनी लिहीलंय की, 26/11 च्या हल्यातील (terrorist attack) अतिरेकी अजमल कसाबला (Ajmal kasab) पकडलं होतं तेव्हा डी बी मार्ग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन आर माळी यांनी त्याच्याकडचा मोबाईलही ताब्यात घेतला होता.

हेही वाचा: शहापूर : ग्रामसेवकाला लाच घेताना अटक

त्यानंतर परमबीर सिंह यांनी माळी यांच्याकडून तो मोबाईल स्वत:कडे घेतला. आणि नंतर त्या मोबाईलची नोंद कुठेही झाली नाही, त्यामुळं तो मोबाईल परमबीर सिंह यांनी अतिरोकी संघटनेला किंवा अतिरेक्यांना मदत करणाऱ्या लोकांना विकला अशी शंका आहे. याचा सखोल तपास करुन परमबीर सिंहांवर कारवाई करावी अशी मागणीही या पत्रात करण्यात आलीय. 26/11 चा हल्ला झाला तेव्हा परमबीर सिंह हे एटीएस म्हणजेच दहशतवादी विरोधी पथकात कार्यरत होते, त्यांनी माळी यांच्याकडून मोबाईल घेऊन तो नंतर तपास अधिकाऱ्यांकडे सोपवायला हवा होता, मात्र तो त्यांनी कुणालाही दिला नाही.

पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात त्या मोबाईलचा उल्लेखही नसल्याचं शमशेर पठाण यांनी त्यांच्या पत्रात लिहीलं आहे. अजमल कसाबकडून मिळालेल्या मोबाईलवरुनच हे अतिरेकी आणि पाकिस्तानातील त्यांचे बॉस एकमेकांच्या संपर्कात होते, तसंच भारतात आणि मुंबईत त्या अतिरेक्यांना कुणी मदत केली, याचे धागोदोरेही त्यातून पोलिसांना मिळाले असते असंही पत्रात नमुद करण्यात आलंय.

परमबीर सिंंह यांनी तो मोबाईल आणि त्यातला डाटा हा अतिशय संवेदनशिल होता, तो नक्कीच पैशांसाठी विकलाय त्यामुळं परमबीर सिंह यांच्यावर देशद्रेहा अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी शमशेर पठाण पत्रातून केलीय.

इतके दिवस गप्प का ?

पोलीस अधिकारी निवृत्त झाले की पोलिस विभागातल्या अनेक गोष्टींबद्दल, गैरव्यवहारांबद्दल बोलत असतात, शमशेर पठाण हे 2012 ला मुंबई पोलिसांतून एसीपी म्हणून निवृत्त झाले, पण परमबीर सिंह यांच्याबद्दलची एवढी मोठी माहीती त्यांनी इतके दिवस का दिली नाही हे विचारलं तेव्हा ते मला म्हणाले की परमबीर सिंह यांनी तो मोबाईल तपास अधकाऱ्याला दिला असेल असंच इतके दिवस वाटत होतं, पण आत्ता परमबीर सिंह यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर मी माळी यांना त्या मोबाईलबद्दल विचारलं तेव्हा तो मोबाईल नंतर कुठेच रेकॉर्डवर आला नाही असं त्यांनी सांगितलं म्हणून मी पोलिस आयुक्तांना पत्र लिहीलं.

loading image
go to top