esakal | Param Bir Singh Letter: भाजप नेत्यांच्या धमाल प्रतिक्रिया, वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Param Bir Singh Letter: भाजप नेत्यांच्या धमाल प्रतिक्रिया, वाचा सविस्तर

भाजपच्या अतुल भातखळकर, अशिष शेलार, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, आदी सर्वच नेत्यांनी आक्रमक शब्दांत सरकारवर टीका केली आहे. 

Param Bir Singh Letter: भाजप नेत्यांच्या धमाल प्रतिक्रिया, वाचा सविस्तर

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई:  कोरोनाच्या फैलावानंतर मुंबईत बार, हुक्कापार्लर इत्यादी लवकर उघडण्याची घाई याचसाठी केली होती का? आता कळले ना की सचिन वाझे नोटा मोजण्याचे यंत्र गाडी घेऊन काय करत होता, अशा शेलक्या शब्दांत भाजप नेते प्रसाद लाड, किरीट सोमैय्या आदींनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

परम बीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर एकीकडे महाविकास आघाडी सरकार आणि त्यांचे घटक पक्ष बचावात्मक पवित्र्यात गेले आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या अतुल भातखळकर, अशिष शेलार, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ, आदी सर्वच नेत्यांनी आक्रमक शब्दांत सरकारवर टीका केली आहे. 

अरे वा, देशमुख साहेब ! काय भारी खेळ चालवलाय हो, महिन्याला 100 कोटी ? अधिकाऱ्यांना सरकारी बंगल्यावर बोलून आकडा ठरवायचे, कोरोनाच्या फैलावत पण मुंबईत बार, हुक्कापार्लर, रेस्टॉरंट उघडायची घाई याचसाठी केली होती का, असे धमाल ट्वीच भाजपचे उपाध्यक्ष आणि विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. परम बीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आहेच, पण या सर्व प्रकरणाची माहिती मुख्यमंत्र्यांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत सर्वांना होती. तरीही देशमुख यांना पाठीशी का घातले गेले, असाही प्रश्न त्यांनी दुसऱ्या ट्विट मार्फत विचारला आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तर आता कळले ना, की सचिन वाझे आपल्या गाडीत नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन काय करत होते ते, अशी प्रतिक्रिया माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. वाझे यांना अटक केल्यावर त्यांनी वापरलेल्या गाडीतून नोटा मोजण्याचे यंत्र एनआयए पथकाने जप्त केले होते. त्याचा संबंध सोमैय्या यांनी या प्रकरणाशी जोडला आहे. 

हेही वाचा- Param Bir Singh Letter: आता थेट अमृता फडणवीस यांची उडी, सरकारवर निशाणा

या विषयावर आता भाजप आक्रमक झाला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आदींनी आज मुंबईत  आणि महाराष्ट्रात या विषयावर आंदोलन करण्याचे जाहीर केले. त्यामुळे देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी राज्यभर हे आंदोलन होत आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Parambir Singh letter case BJP leaders reaction on anil deshmukh resign

loading image