गृहमंत्री नॉट रिचेबल? शरद पवारांचा अनिल देशमुखांना फोन

गृहमंत्री नॉट रिचेबल? शरद पवारांचा अनिल देशमुखांना फोन

मुंबई: गृहरक्षक दलाचे कमांडर जनरल परम बीर सिंग यांच्या एका लेटरबॉम्बने राज्यात खळबळ उडाली आहे. परम बीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिण्यानं गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप झाले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यांवर असा आरोप केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा केला आहे. या पत्रानंतर अनिल देशमुख यांनीही एक पत्रक काढलं आणि आपली बाजू मांडली. आरोप सिद्ध करावेत अन्यथा परम बीर सिंग यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.  

या लेटर बॉम्ब टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये एकच खळबळ माजली आहे. थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अनिल देशमुख सकाळी एमपीएससी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं. मात्र अनिल देशमुख यांनी अद्याप प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली नाही आहे. 

शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. या सर्व प्रकारानंतर शरद पवार यांनी गृहमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहितीसमोर आली आहे.

दरम्यान काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणात गृहमंत्र्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. 

परमबीर सिंग मलाही भेटले होते. त्यावेळी त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडलं होतं. त्याचबरोबर माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं म्हटलं होतं. त्यापलीकडे त्यांनीही मला काहीही सांगितलं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तसंच पत्रकार परिषदेपूर्वीच माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

Parambir Singh letter Sharad Pawar called Anil Deshmukh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com