esakal | शिक्षक संघटनांनी केलेल्या आवाहनाला पालकांनी दिला प्रतिसाद ; शाळा राहिल्या बंद
sakal

बोलून बातमी शोधा

School

शिक्षक संघटनांनी केलेल्या आवाहनाला पालकांनी दिला प्रतिसाद ; शाळा राहिल्या बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्र सरकारची शेतकरी विरोधी धोरणे आणि लखीमपुर येथे भाजप मंत्र्यांच्या मुलाकडून शेतकऱ्यांची गाडीखाली चिरडून करण्यात आलेल्या हत्येचा च्या विरोधात महविकास आघाडी सरकार आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदचे शिक्षण क्षेत्रावर ही पडसाद उमटले. मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था बंद राहिल्या. तर अनेक ठिकाणी शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थाचालक संघटनांनी या बंदमध्ये आपला पाठींबा दर्शवत आपल्या संस्था बंद ठेवल्या होत्या.

केंद्राच्या शेतकरी विरोधातील भूमिका, आणि त्यांचे मागील नऊ महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन याला आपला पाठींबा दर्शवत लोक भारती, कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती यांच्यासह बहुजन विद्यार्थी संघटना आदींनी राज्यव्यापी बंदला आपला पाठिंबा जाहीर केला होता. शिवाय शाळा, महाविद्यालये सोबत शिक्षक विद्यार्थी यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संघटनांकडून करण्यात आले होते. त्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी सांगितले. तर मुंबईसह ठाण्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असल्याची माहिती बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाणी यांनी दिली.

दरम्यान, मुंबईत काही ठिकाणी तुरळक प्रमाणात खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा सुरू होत्या, मात्र उपस्थिती ही खूप कमी होती, अशी माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

loading image
go to top