esakal | 2 वर्षांपूर्वी धोकादायक घोषित केलेला 'आरे'मधला ब्रिजचा भाग कोसळला
sakal

बोलून बातमी शोधा

2 वर्षांपूर्वी धोकादायक घोषित केलेला 'आरे'मधला ब्रिजचा भाग कोसळला

आरे येथील फिल्टरपाडा परिसरातील रहदारीच्या ब्रिजचा काही भाग कोसळला.  पवई फिल्टर पाडा इथे पवई जयभीम नगर ते आरे कॉलनीला जोडणाऱ्या पुलाचा छोटासा भाग कोसळला आहे. पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

2 वर्षांपूर्वी धोकादायक घोषित केलेला 'आरे'मधला ब्रिजचा भाग कोसळला

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः आरे येथील फिल्टरपाडा परिसरातील रहदारीच्या ब्रिजचा काही भाग कोसळला.  पवई फिल्टर पाडा इथे पवई जयभीम नगर ते आरे कॉलनीला जोडणाऱ्या पुलाचा छोटासा भाग कोसळला आहे. पुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

2 वर्षांपूर्वी आरे येथील ब्रिज हा धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला होता. मात्र कोणतीच पावलं उचलली नाही म्हणून ब्रिजचा काही भाग कोसळला. सध्या हा पूल वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाचं दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही आहे.

अधिक वाचा-  ST च्या कर्तव्यावरच वडिलानंतर मुलाचाही मृत्यू, सानप कुटूंबियांवर दुखा:चा डोंगर

दरम्यान, पुलाचा काही भाग कोसळ्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक नागरिक रस्त्यावर एकत्र जमा झाले. रस्त्याचं काम सध्या सुरु आहे. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा,

--------------------------------

Part of the bridge in Aarey which was declared dangerous 2 years ago collapsed