BIG BREAKING : शरद पवारांच्या भेटीसाठी पार्थ पवार 'सिल्व्हर ओक'वर पोहोचलेत

सुमित बागुल
Thursday, 13 August 2020

कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर आज अजित पवारांचे सुपुत्र थोड्याच वेळापूर्वी शरद पवारांच्या मुंबईतील निवास्थान असलेल्या 'सिल्व्हर ओक' बंगल्यावर पोहोचलेत.

मुंबई : काल शरद पवार यांनी नातू पार्थ पवारांबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संध्याकाळी अजित पवार यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओक वर भेट घेतलेली. यावेळी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.

यानंतर आज अजित पवार यांनी माध्यमांना याबाबत कोणत्याही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. अजित पवारांनी या प्रकरणावर पूर्णतः मौन बाळगलेलं पाहायला मिळतंय. दरम्यान अजित पवार आज सकाळपासून मंत्रालयात होते. दुपारच्या वेळेस सुप्रिया सुळे यांनी आपलं यशवंतराव चव्हाणमधील काम संपवून मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आता घडामोडींचा वेग आलाय. 

मोठी बातमी : "अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता", राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतायत हे जाणणाऱ्या नेत्याने केली सूचक कमेंट

पार्थ पवार 'सिल्व्हर ओक'वर : 

कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर आज अजित पवारांचे सुपुत्र थोड्याच वेळापूर्वी शरद पवारांच्या मुंबईतील निवास्थान असलेल्या 'सिल्व्हर ओक' बंगल्यावर पोहोचलेत.  सिल्व्हर ओक वर सुप्रिया सुळे देखील उपस्थित असल्याचं समजतंय. या सर्व पत्रकारांना आता सुप्रिया सुळे यांनी मध्यस्ती केल्याचं समजतंय.    

मंगळवारी झाली होती भेट : 

मंगळवारी देखील सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांची भेट झालेली. स्वतः सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांसोबतचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून  शेअर केलेला. यामध्ये पार्थ आणि सुप्रिया सुळे पाहायला मिळाल्या होत्या आणि त्या फोटोखाली सुप्रिया सुळे यांनी चिलिंग विथ पार्थ असं कॅप्शनही दिलेलं होतं. 

parth pawar reached silver oak to meet sharad pawar and supriya sule

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parth pawar reached silver oak to meet sharad pawar and supriya sule