esakal | मोठी बातमी : "अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता", राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतायत हे जाणणाऱ्या नेत्याने केली सूचक कमेंट
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी : "अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता", राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतायत हे जाणणाऱ्या नेत्याने केली सूचक कमेंट

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद आहे. बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचे काही खरं नाही. श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन होईल. महायुतीचे सरकार येईल.

मोठी बातमी : "अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची शक्यता", राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतायत हे जाणणाऱ्या नेत्याने केली सूचक कमेंट

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मुंबईतल्या धुवाधार पावसात मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापलंय. अर्थात याला कारण म्हणजे, शरद पवार यांनी आपलेच नातू पार्थ पवारांच्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेल्या CBI चौकशीच्या मागणीवर केलेलं भाष्य. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय परिघात आता चर्चांना उधाण आलंय. दरम्यान या प्रकरणात आता महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील मोठ्या नेत्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. असं म्हणतात या नेत्याला राजकीय हवा कोणत्या बाजूला जातेय याचा लगेच पत्ता लागतो

केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे नेते रामदास आठवले यांनी सुशांत सिंह प्रकरणात आणि पार्थ पवार प्रकरणात भाष्य केलंय. त्या सोबतच त्यांनी लवकरच अंतर्गत बंडाळीमुळे या सरकारचं विसर्जन होईल असंही म्हटलंय. जाणून घेऊयात रामदास आठवले काय म्हणालेत. 

अमिताभ बच्चन यांनाही सुरवातीला नाकारलं गेलं...

नवीन अभिनेते आणि अभिनेत्र्या चांगली काम करणारे आहेत. अनेक वेळेस अनेक कलाकारांवर अन्याय होतो. अमिताभ बच्चन हे देखील जेंव्हा मुंबईत आलेत तेंव्हा त्यांना त्यांना अनेकदा काम मिळालं नाही. मात्र अमिताभ बच्चन हे त्या परिस्थितीत जिद्दीने उभे राहिलेत आणि आज ते इंडस्ट्रीचे बिग बी आहेत.

मोठी बातमी - पार्थ यांच्यावरील 'कवडीची किंमत देत नाही' मतानंतर आज NCP च्या बड्या नेत्यानं म्हटलं 'नया है वह'

सुशांतवर अन्याय झाल्याची माहिती आहे...

सुशांतवर काही प्रमाणात अन्याय झाल्याची माहिती आहे. या प्रकरणात CBI ची चौकशी व्हावी, कुणावर जाणीवपूर्वक अन्याय व्हावा असं अजिबात नाही, मात्र या प्रकरणाची योग्य दिशेने चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील चौकशी CBI मार्फत व्हायला हवी. या आधीही महाराष्ट्रातील किंवा मुंबईतील अनेक प्रकरणांमध्ये CBI मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली गेलेली. याचा अर्थ मुंबई किंवा महाराष्ट्र पोलिसांवर अविश्वास असणं अजिबात नाही. अनेक प्रकरणांमध्ये या आधी राज्याकडून CBI तपासाची मागणी केली गेलीये आणि ती झाली ही आहे

पार्थ यांनी मांडलेली भूमिका योग्य

सुशांत सिंह प्रकरणात पार्थ यांनी CBI चौकशीची मागणी केलीये. याप्रकरणी शरद पवार साहेबांना हे योग्य नसल्याचं वाटलं. पार्थ  हे 'माझ्या' पक्षात आहेत, माझा पक्ष सरकारमध्ये आहे, म्हणून त्यांना वाटलं असेल की पार्थ यांनी तशी मागणी करायला नको होती. मात्र पार्थ यांची मागणी योग्य आहे. एवढे दिवस या प्रकरणात योग्य तपास होत नाही असं पार्थ यांना वाटणं हा त्यांचा अधिकार आहे आणि ते योग्य आहेत. पार्थ यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे आणि आमचीही तीच मागणी आहे. 

मोठी राजकीय घडामोड : अजित पवारांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे मंत्रालयात

या सरकारचं भवितव्य फार दिवस राहील असं वाटत नाही.​..

या सरकारचं भवितव्य फार दिवस राहील असं वाटत नाही. आता गणेश उत्सव आहे, ज्या प्रकारे गणेशाचं विसर्जन होतं. त्याचप्रकारे या सरकारचं देखील विसर्जन होईल याची आम्हाला अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षात बरेच वाद आहेत. आता शरद पवारांनी पार्थ पवारांच्या संबंधात मांडलेल्या मतामुळे अजित पवार नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार सुद्धा बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार यांनी या आधीच देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत सुद्धा बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसमध्येही बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या राज्यात आता महायुतीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही.   

ajit pawar may leave NCP once again due to sharad pawars comment on parth pawar says ramdas athawale