esakal | आजोबांच्या वक्तव्यावरून दुखावलेले पार्थ पवार लवकरच घेणार मोठा निर्णय?
sakal

बोलून बातमी शोधा

आजोबांच्या वक्तव्यावरून दुखावलेले पार्थ पवार लवकरच घेणार मोठा निर्णय?

आजोबांच्या वक्तव्यानंतर  पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पार्थ पवार पुण्याच्या दिशेनं रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

आजोबांच्या वक्तव्यावरून दुखावलेले पार्थ पवार लवकरच घेणार मोठा निर्णय?

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात वक्तव्य केल्यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. आजोबांच्या वक्तव्यानंतर  पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पार्थ पवार पुण्याच्या दिशेनं रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात जाऊन पार्थ पवार कुटुंबाशी चर्चा करणार आहेत. पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार, जयंत पवार तसंच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तसंच सध्याची राजकीय स्थिती बघता निर्णय घेण्याची ही योग्य वेळ असल्याचा दावाही पार्थ पवार यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. 

शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार यांनी गुरुवारी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांनी सव्वा दोन तास चर्चा केली. त्यावेळी पार्थ आणि सुप्रिया सुळे यांच्यातच चर्चा झाल्याचं समजतंय. शरद पवार आणि पार्थ यांची भेट झाली नसल्याचं कळतं. त्यानंतर आता कुटुंबातील इतर सदस्यांसोबत बोलण्याचा निर्णय पार्थ पवार यांनी घेतला आहे. पार्थ पवार हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसंच मुलाला फटकारल्याने अजित पवारही नाराज झाल्याचं सांगण्यात येतंय. पवारांच्या विधानानंतर अजित पवार यांनीही सिल्व्हर ओककडे धाव घेतली होती. त्यावेळी पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची बैठक झाली. यावेळी अजित पवार यांनी मुलगा पार्थची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

हेही वाचाः  आजोबांच्या वक्तव्यावर पार्थ पवार नाराज?, जयंत पाटील यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर  केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात एक नवा वाद उफाळून आला आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला. आज सकाळी धनजंय मुंडे, अदिती तटकरे आणि सुनील तटकरेही पवारांच्या घरी गेले होते. काही वेळ त्यांनी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. 

अधिक वाचाः सामनाचा आजचा अग्रलेख 'आजोबा- नातवा' वर, शिवसेनेला वाटतंय...

पवार कुटुंबीयांमधील प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून प्रयत्न सुरू झाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुपारी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली.

parth pawar upset from sharad pawar remark he take big political decision after speaking other family members