esakal | ऐरोली,कोपरखैरणे येथील पास केंद्र आजपासून सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ऐरोली,कोपरखैरणे येथील पास केंद्र आजपासून सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : कोरोनाकाळात नवी मुंबई महापालिका परिवहन अत्यावश्यक सेवेत असल्याने सरकारच्या निर्देशानुसार बस सेवा अति अल्प प्रमाणात सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे परिवहन उपक्रमाचे पास केंद्रही बंद होते.

हेही वाचा: 15 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद ; पाहा व्हिडिओ

२३ सप्टेंबरपासून वाशी व सीबीडी या दोन बसस्थानकातील पास केंद्र पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. तर ऐरोली व कोपरखैरणे बसस्थानकातील केंद्र ७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. हे पास केंद्र रविवार व सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त इतर दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी या पास सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी केले आहे.

loading image
go to top