
मुंबई : येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे तिकिटांचे आरक्षण मोठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या उपलब्ध असलेली आरक्षण प्रणाली प्रवाशांच्या सोयीऐवजी अडचणी निर्माण करत असल्याने, टप्प्याटप्प्याने (४५, ३० आणि १५ दिवस आधी) अॅडव्हान्स रिझर्व्हेशन कालावधी (एआरपी) सुरू करण्याची मागणी चाकरमान्यांच्या संघटनांकडून होत आहे.