धावत्या लोकलमधून हात सुटल्याने प्रवासी जखमी; समजा माध्यमांवर व्हिडीओ वायरल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Passengers injured hand slips from running train  video goes viral on the social media mumbai

धावत्या लोकलमधून हात सुटल्याने प्रवासी जखमी; समजा माध्यमांवर व्हिडीओ वायरल!

मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा ते कळावा दरम्यान प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा हात सुटल्यानं तो ट्रॅकवर पडला आणि त्यात तो गँभीर जखमी झालेला आहे. प्राथमिक महिनीनुसार, कळव्यामधील शिवाजी रुग्णालयात जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ डेक्कन क्वीनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशांनी आपल्या कॅमेरा कैद केला. सध्या हा व्हिडीओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आज सकाळी कळवा ते दिव्या दरम्यान धावत्या लोकलच्या पेटाग्राफ केबिनमधील दारात लटकून काही स्टंटबाज तरून प्रवास करत होते.

बाजूने जाणाऱ्या डेक्कन क्वीनमधून मयूर लिमये हा रेल्वे प्रेमी प्रवास करत होता. तेव्हा बाजूने जाणाऱ्या लोकलमध्ये जिथे दरवाजा देखील नाही,अश्या गार्ड कबिचा दाराला चार तरून प्रवासी लटकत प्रवास करत असल्याचे त्याला दिसले. तेवढ्यात त्यातल्या एकाने हात सोडला आणि समोरून येणाऱ्या खांब्याला त्याचा हात लागला. त्यामुळे तो रेल्वे रुळावर पडला आहे. ही घटना घडताच काही अंतरावर तीन पैकी एक जण पुन्हा खाली पडला. या घटनेत दोघेही प्रवासी गँभीर जखमी झाले आहे. ठाणे लोहमार्ग पोलिसांना याबाबद माहिती विचारली असता घटना सत्य असल्याचा दुजोरा दिला आहे.मात्र, या घटनेची माहिती घेऊन तुम्हाला सांगतोय असे त्यांनी सांगितले.

या दोन्ही जखमी प्रवाशांवर कळवामधील शिवाजी रुग्णालय दाखल करण्यात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे समजत आहे. मध्य रेल्वेकडून या अपघाताबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लोकल दारावर लटकणाऱ्या आणि स्टंटबाजी करणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वे पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येते. मात्र, गेल्या काही महिन्यापासून लोकल ट्रेनचा दारात लटकणाऱ्या आणि स्टंटबाजी कारवाई थंडावली दिसून येत आहे. आजच्या या भयंकर अपघातामुळं मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Web Title: Passengers Injured Hand Slips From Running Train Video Goes Viral On The Social Media Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top