Panchavati Express च्या डब्याची कपलिंग निघाल्याने प्रवाशांमध्ये घबराट; 'या' स्थानकात घडली घटना, प्रवासी सुखरुप

इंजिन चालकाने थोड्या अंतरावर गाडी थांबवल्याने पुढील धोका टळला.
Panchavati Express
Panchavati Expressesakal
Updated on
Summary

पंचवटी एक्सप्रेसमधून हजारो चाकरमानी मनमाड ते मुंबई असा रोज प्रवास करून ये-जा करत असतात.

खर्डी : मनमाड ते मुंबई रेल्वे मार्गावर (Manmad to Mumbai Rail) धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसच्या (Panchavati Express) डब्यांचे कपलिंग कसारा स्थानकात (Kasara Station) सकाळी अचानक निघाल्याने आणि इंजिन पुढे निघून गेल्याने प्रवाशांमध्ये थोडावेळ घबराट पसरली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व दुखापत न झाल्याने प्रवाशांनी निश्वास सोडला.

पंचवटी एक्सप्रेसमधून हजारो चाकरमानी मनमाड ते मुंबई असा रोज प्रवास करून ये-जा करत असतात. सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास कसारा स्थानकात पंचवटी एक्सप्रेसचे तीन व चार नंबरच्या डब्यांचे कपलिंग निघाल्याने आणि इंजिनापासून हे डबे वेगळे झाल्याने अपघात होण्याची शक्यता होती.

Panchavati Express
Government Scheme : माझी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेणाऱ्यांवर पोलिस कारवाई करा - पालकमंत्री हसन मुश्रीफ

परंतु, इंजिन चालकाने थोड्या अंतरावर गाडी थांबवल्याने पुढील धोका टळला. तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन डब्यांची इंजिनासोबतच्या डब्याशी जुळवाजुळव करून 30 ते 35 मिनिटांत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. रेल्वेने वेळोवेळी गाड्यांचा मेंटनस केल्यास अशा घटना टाळता येतील, यासाठी रेल्वेने प्रयत्न करावेत असे रेल्वे प्रवाशी संघटनेचे शैलेश राऊत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.