कोरोना संकटात '108' रुग्णवाहिकेची धाव; मुंबईसह राज्यातील रुग्णांना मिळाला मोठा आधार

कोरोना संकटात '108' रुग्णवाहिकेची धाव; मुंबईसह राज्यातील रुग्णांना मिळाला मोठा आधार
Updated on


मुंबई: आपात्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी महाराष्ट्रात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या संकट काळात केवळ आपात्कालीन सुविधेसाठीच नव्हे तर, कोरोनासह नाॅनकोव्हिड रुग्णांनाही या रुग्णवाहिकेचा मोठा आधार मिळाला. 20 मार्च ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात '108' रुग्णवाहिकेने 4 लाख 42 हजार 942 रुग्णांना सेवा दिली आहे.

राज्यात अशा 937 रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी 507 रुग्णवाहिका कोव्हिड रुग्णांसाठी देण्यात आल्या आहेत. तर, 430 नॉन कोव्हिड रुग्णांसाठी आहेत. मुंबईत 93 रुग्णवाहिका सेवा देत आहेत. राज्यात आतापर्यंत या रुग्णवाहिकांनी 2 लाख 75 हजार 610 कोव्हिड रुग्णांना सेवा दिली. तर, 1 लाख 67 हजार 332 नॉन कोव्हिड रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवले आहे. 
सुरुवातीला कोव्हिड रुग्णांना खाटा, आयसीयू बेड आणि रुग्णवाहिका मिळणेही ही कठीण झाले होते. त्यातून अनेकांचे मृत्यू ओढावल्याच्या घटनाही घडल्या. मात्र, ही परिस्थिती आता नियंत्रणात येत असल्यामुळे रुग्णांना सहजपणे रुग्णवाहिका उपलब्ध होत आहे. 

मुंबईत 35 हजार रुग्णांना सेवा
मुंबईत नॉन कोव्हिड रुग्णांसाठी 29 रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांनी मार्च महिन्यापासुन 15 ऑगस्टपर्यंत मुंबईतील 34 हजार 990 रुग्णांना सेवा दिली आहे. त्यातील 25 हजार 885 कोरोना रुग्ण होते. तर, 9 हजार 105 नॉन कोव्हिड रुग्ण होते. 
 

राज्यात कोव्हिड आणि नॉन कोव्हिड रुग्णांना रुग्णवाहिका पुरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यशही आले आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना उपचार मिळेपर्यंत कर्मचारी प्रयत्न करत आहेत. सेवा अशीच अखंड सुरु राहणार आहे. 
- डॉ. ज्ञानेश्वर शेळके,
सीईओ, आपात्कालीन वैद्यकिय सेवा

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com