मजुरांच्या रेल्वे तिकीटाचे पैसे भरणार; राज्य सरकारचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

राज्यात अडकलेल्या मजूरांचे रेल्वे तिकीटाचे पैसै भरण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातून हजारो मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत.  तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. 

मुंबई : राज्यात अडकलेल्या मजूरांचे रेल्वे तिकीटाचे पैसै भरण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातून हजारो मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत.  तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यातून येत आहेत. 

ही बातमी वाचली का? ...म्हणून महाडकरांचे टेन्शन वाढले

लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्या या मजूरांकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत. कामगारांची परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  हा निर्णय घेतला आहे. या तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून भरण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मजूरांना मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाने काढला आहे. 

ही बातमी वाचली का? रायगडमध्ये हे आहेत 38 नवे तारणहार

राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून परराज्यातील मजूर, पर्यटक, नागरिक मोठ्या संख्येने राज्यात अडकून पडले आहेत. परराज्यातील मजुरांची संख्या किती आहे. त्याचे नियोजन महसूल विभाग, गृहखाते, महापालिका प्रशासन सध्या करीत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. त्यानुसार रेल्वे प्रवासाच्या खर्चाचा भार उचलावा लागत आहे. याच बरोबर इतर राज्यांत अडकून पडलेल्या राज्यातील मजूर, पर्यटक, प्रवासी यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याही प्रवास खर्चाचा भार राज्याला उचलावा लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pay for workers' train tickets; Decision of the State Government