रायगडमध्ये हे आहेत 38 नवे तारणहार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थितीत या अधिकाऱ्यांना 1 एप्रिलपासूच रुजू करण्यात येणार होते; परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना प्रशिक्षण आणि अंतिम परीक्षा देता आली नव्हती. ही परीक्षा 38 जणांनी पूर्ण केली आहे. 

अलिबाग  रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सामाजिक आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) नेमण्याचा मार्ग मोकळा झाला असून सोमवार (ता.11) पासून ते रुजू होणार आहेत. 

 
हे वाचा : कॉंग्रेसच्या साहसवादाला विरोध 

कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थितीत या अधिकाऱ्यांना 1 एप्रिलपासूच रुजू करण्यात येणार होते; परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना प्रशिक्षण आणि अंतिम परीक्षा देता आली नव्हती. ही परीक्षा 38 जणांनी पूर्ण केली आहे. 
त्यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने आरोग्यवर्धिनी योजनेतून 210 सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. नव्याने नेमण्यात आलेले डॉक्‍टर ग्रामीण भागात कार्यरत राहणार आहेत. मुंबईच्या जवळ असूनही रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम होऊ शकलेली नाही. 

हे वाचा : नोकरी मिळत नाही...पण घाबरू नका... 

आजही दुर्धर आजारांवरील चांगल्या उपचारांसाठी जिल्ह्यातील रुग्णांना मुंबई अथवा नवी मुंबईतील रुग्णालयांची मदत घ्यावी लागते आहे. कोरोनावरील उपचारासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत कोव्हिड रुग्णालय उभारण्यात आले आहे. कोव्हिड विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने, अशा वेळेला आरोग्य अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यानुसार या अधिकाऱ्यांची मदत होणार आहे. 

 
रायगड जिल्ह्यात चांगली आरोग्य यंत्रणा असतानाही उपचार करणारे डॉक्‍टर नसल्यामुळे आरोग्य सेवेवर ताण पडत होता. नव्याने नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आणि अंतिम परीक्षा लॉकडाऊनमुळे घेणे शक्‍य झाले नव्हते. परीक्षा देणारे 38 जण सोमवारपासून रुजू होत आहेत. 
- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड. 

रायगड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था 
52 आरोग्य केंद्र, 
255 उपकेंद्र 
9 ग्रामीण रुग्णालये 
56 रुजू होणारे वैद्यकीय अधिकारी 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An emergency due to the corona, a community health officer will be appointed from April 11 in Raigad district