esakal | लैगिक अत्याचारप्रकरणी अनुराग कश्यप गोत्यात येणार का ? आठ तास सुरु होती चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

लैगिक अत्याचारप्रकरणी अनुराग कश्यप गोत्यात येणार का ? आठ तास सुरु होती चौकशी

अनुरागनं देखील ट्विट करून पायल घोष हिने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याने ट्विट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे

लैगिक अत्याचारप्रकरणी अनुराग कश्यप गोत्यात येणार का ? आठ तास सुरु होती चौकशी

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैगिक अत्याचाराचे आरोप केल्याप्रकरणी गुरूवारी वर्सोवा पोलिसांनी दिग्दर्शक अनुराग कश्यपची तब्बत आठ तास चौकशी केली.  मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स पाठवुन गुरूवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते.

पायल घोषसोबत गैरवर्तन आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसाकडून अनुरागला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आला होता. गुरुवारी सकाळी 10 वाजता अनुरागला चौकशीसाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्यानुसार अनुराग कश्यप गुरूवारी सकाळी वर्सोवा पोलिस ठाण्यात दाखल झाला. यावेळी त्याचे वकीलही यावेळी त्याच्यासोबत होत्या. पोलिसांनी घटनेबाबत घोषने दिलेल्या माहितीची पडताळणी अनुरागकडून केली. यावेळी त्याचा जबाबही नोंदवण्यात आला. आठ तास चाललेल्या या चौकशीत कश्यप यांना सर्व यांनी सहकार्य केले असून गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलवण्यात येणार आहे. 2013 ला घटनेच्या दिवसाबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली.वर्सोवा पोलिसांनी याप्रकरणी पायल घोषची गुरूवारी वैद्यकीय तपासणी केली. कूपर रुग्णालयातही वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

महत्त्वाची बातमी :  उत्तरप्रदेश पोलिस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? राज ठाकरेंचा सवाल

पायल घोषने एक ट्विट करत अनुरागवर गंभीर आरोप केले आहेत. अनुरागने माझ्यासोबत असभ्य वर्तन केले असून मला वाईट वागणूक दिली होती. या व्यक्तीवर कारावाई करा तेव्हाच या माणसाचे खरे रुप समोर येईल. या ट्विटमुळे माझ्या जीवाला धोका असून माझी मदत करा, असे म्हणत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी पायलची भेट घेतली आहे, तसेच, दोघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अनुराग कश्यपविरोधात लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

तर दुसरीकडे  एक पत्रक जारी करत अनुरागच्या वकिलांनी त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. माझ्या अशीलावर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे करण्यात आलेले आरोप चुकीचे असून यामुळे त्याना दुःख झाले आहे. हे सर्व आरोप हे बिनबुडाचे, खोटे आहेत. महिलांवर होणारे अत्याचार समोर यावेत यासाठी सुरू झालेली मी टू चळवळ सध्या स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वार्थासाठी वापरली जात असून यामुळे समोरच्या व्यक्तीचे चारित्र्य हनन होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून हे खोटे आरोपच या चळवळीला कमकुवत बनवितात असे अनुरागच्या वकिलांनी म्हटले आहे.

महत्त्वाची बातमी : लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी बनवून द्यायचा बनावट QR कोड पास, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दरम्यान, अनुरागनं देखील ट्विट करून पायल घोष हिने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याने ट्विट करत हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. आणखी आक्रमणे व्हायची आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. अनेकांचे फोन आले, की काही बोलू नकोस, शांत बस. हे पण माहित आहे की, माहित नाही कुठल्या दिशेने बाण येणार आहेत, असे अनुरागने त्याच्या ट्विटमध्ये केले आहे. 

payal ghosh and anurag kashyap case director interrogated for eight hours by versova police