पायल घोषचा आरपीआयमध्ये प्रवेश; पक्ष संघटना वाढवण्याचे काम करणार

तुषार सोनवणे
Monday, 26 October 2020

गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोषने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मध्ये प्रवेश घेतला.

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोषने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मध्ये प्रवेश घेतला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्ष प्रवेश करून पक्षाचं संघटन वाढवण्याचं काम करणार असल्याचे घोष हिने म्हटले आहे.

मराठा आरक्षण: उद्या सुनावणी; राज्य सरकारची तयारी कितपत, संभाजीराजेंचा सवाल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल करणारी पायल घोषने आता राजकिय जीवनाची सुरूवात केली आहे. कश्यप विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीदेखील भेट घेतली होती. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याने वाय दर्जाच्या सुरक्षेचेही तिने मागणी केली होती. दरम्यान याप्रकरणी रिपब्लिकन पक्ष पायलच्या पाठीशी असल्याचे आठवले .यांनी म्हटले होते. यापार्श्वभूमीवर पायलने रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्यानंतर तीने अनुराग कश्यपवर अत्याचाराचे आरोप केले.मात्र अद्यापही पोलिसांनी अनुराग कश्यप वर कारवाई केली नसल्याचे तीने म्हटले आहे.

----------------------------------------------------------

Payal Ghosh enters RPI The party will work to increase the organization 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Payal Ghosh enters RPI The party will work to increase the organization