पायल घोष- रिचा चड्ढामध्ये तडजोड; पायलचा माफीनामा तर रिचाचा दावा मागे

सुनीता महामुणकर
Wednesday, 14 October 2020

अनुराग कश्यपवर लैंगिक छळवणुकीचे आरोप करताना अभिनेत्री रिचा चढ्ढाचा उल्लेख केल्याबद्दल  वादात सापडलेल्या अभिनेत्री पायल घोष आणि रिचाला वादावर आज अखेर दोघींनी तडजोड झाल्याचे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. पायलने माफीनामा दाखल केला असून रिचानेही तिच्या विरोधात केलेला दावा मागे घेतला.

मुंबई:  अनुराग कश्यपवर लैंगिक छळवणुकीचे आरोप करताना अभिनेत्री रिचा चढ्ढाचा उल्लेख केल्याबद्दल  वादात सापडलेल्या अभिनेत्री पायल घोष आणि रिचाला वादावर आज अखेर दोघींनी तडजोड झाल्याचे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. पायलने माफीनामा दाखल केला असून रिचानेही तिच्या विरोधात केलेला दावा मागे घेतला.

पायल या प्रकरणात  बिनशर्त माफीनामा दाखल करण्यास तयार आहे, मात्र काही शर्तीवर चर्चा करायची आहे, असे पायलच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सांगितले होते. त्यानुसार पायल आणि रिचामध्ये चर्चा झाली असून समेट झाला आहे, असे पायलचे वकील नितीन सातपुते यांनी सांगितले. याचा तपशील न्यायालयात दाखल करण्यात आला. यानुसार पायलने रिचासंबंधी केलेले सर्व विधान मागे घेतले असून माफिनामा दाखल केला आहे. रिचानेही दावा मागे घेतला असून याप्रकरणी आता दोघीही एकमेकांविरोधात तक्रारी करणार नाही, असे मान्य केले आहे.

रिचाने अभिनेता कमाल खान यांच्या विरोधात ही दावा केला आहे. रिचाबाबत यापुढे विधान करणार नाही, मात्र या प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल करायचे आहे, असे खान यांच्या वतीने एड मनोज गडकरी यांनी सांगितले. न्या ए के मेनन यांनी त्यांना सहा आठवड्याची मुदत दिली आहे.

अधिक वाचाः  सीएची परीक्षा पुढे ढकलली, परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
 

रिचा चढ्ढाने पायल विरोधात न्यायालयात 1.1 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. पायलसह कमाल खान आणि एका चॅनेल विरोधातही हा दावा रिचाने केला आहे. या प्रकरणात केलेले विधान मागे घेण्यास पायल तयार आहे आणि बिनशर्त दिलगिरीही व्यक्त करीत आहे, रिचाचा उल्लेख अनवधानाने झाला, असे पायलच्या वतीने सातपुते यांनी यापूर्वी सांगितले होते.  रिचासंबंधी कोणत्याही पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यास न्यायालयाने अंतरिम मनाई सर्व पक्षकारांना केली आहे.

अधिक वाचाः  आता मास्क न वापरणाऱ्यांची खैर नाही, पोलिसांच्या मदतीने पालिका करणार कारवाई

सन 2013 मध्ये अनुराग कश्यपने लैंगिक छळवणूक केले असा आरोप पायलने सोशल मीडियावर केला आहे. हा तपशील खाननेही रिपोस्ट केला होता तर एका युट्यूब चॅनेलने प्रसारित केला होता. यामध्ये रिचाचा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने घेण्यात आला आहे.

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Payal Ghosh unconditional apology accepted by Bombay High Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Payal Ghosh unconditional apology accepted by Bombay High Court