आता मास्क न वापरणाऱ्यांची खैर नाही, पोलिसांच्या मदतीने पालिका करणार कारवाई

समीर सुर्वे
Wednesday, 14 October 2020

मुंबईत विना मास्क फिरणाऱ्यांची आता खैर नाही. मुंबई महापालिकेचे पथक आता पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई करणार आहेत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तसे आदेशच दिले आहेत.

मुंबई: मुंबईत विना मास्क फिरणाऱ्यांची आता खैर नाही. मुंबई महापालिकेचे पथक आता पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई करणार आहेत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी तसे आदेशच दिले आहेत. त्याचबरोबर नगरसेवकांचीही मदत घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहे.

या कारवाईसाठी महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त आराखडा तयार करावा असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते आणि कर्मचारी, प्रभातफेरीला मास्क न वापरणाऱ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. 

आयुक्तांनी अतिरीक्त आयुक्तांसह सहाय्यक अधिकारी आणि रुग्णांच्या अधिष्टात्यांसमवेत पोलिस प्रशानसासोबत बैठक घेतली. या बैठकिला पोलिस उपायुक्त शहाजी उमप उपस्थित होते. सार्वजनिक परिसरांमध्‍ये ‘विना मास्क’ वावरणाऱ्या नागरिकांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी दंडात्‍मक कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. यानुसार आजतागायत 40 हजार पेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, यापोटी रुपये 1 कोटी 5 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाई ही आता अधिक कठोरपणे राबविण्याचे निर्देश आजच्या बैठकी देण्यात आले. 

अधिक वाचाः  लॉकडाऊनमुळे रिक्षा,टॅक्सी चालक अडचणीत;  वाहनतळ पार्किंगही ओस

दंड वाढणार

आयुक्तांनी यावेळी आवश्यक कलमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या बिना मास्क वावरणाऱ्याकडून 200 रुपयांचा दंड आकारला जातो. हा दंड 400 रुपयांपर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. त्याच पालिका आणि पोलिस सबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई ही करु शकतील.

------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Covid 19 Without mask fine BMC take action with help police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Without mask fine BMC take action with help police