
Latest Crime news: पेण न्यायालयातील सरकारी वकील यांनी आरोपी विरोधात ठोस युक्तिवाद न करण्याकरीता तक्रारदार यांच्या कडून १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारल्या प्रकरणी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर सरकारी वकीलास दि. ४ डिसेंबर रोजी सापळा रचून अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार व त्यांचा मित्र यांचे विरोधात पेण पोलीस ठाणे येथील नोंद असलेल्या गुन्ह्याचे दोषारोप पत्र सदर न्यायालयात दाखल असून सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तक्रारदार आणि त्यांचा मित्र यांनी संबंधित न्यायालयात डिस्चार्ज अर्ज दाखल केला होता.