esakal | 'हा तर बेशरमपणाचा कळस', पेंग्विनच्या मुद्यावर शेलारांचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ashish Shelar

'हा तर बेशरमपणाचा कळस',पेंग्विनच्या मुद्यावर शेलारांचा संताप

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: पेंग्विनच्या विषयावर (penguin row) बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी, मुळात टेंडर मागे घेतलं जाणार नाही. वा त्यात काही बदल केले जाणार नाही, असं सांगितलं. "१०% वाढ करून टेंडर आलेलं आहे. कोर्टाने देखील कौतुक केलेलं आहे. १५ कोटींच टेंडर ३ वर्षांसाठी आहे. बाहेरून आलेले पक्षी आहेत. त्यांच्यावर खर्च होतोय, तो होणारच. त्यात आपण बदल करू शकत नाही" असे मुंबईच्या महापौर म्हणाल्या.

याच पेंग्विनच्या मुद्यावरुन भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. "महापौरांनी शहराबाबत प्राथमिकता बदलली आहे. खड्डे बुजवायला 48 कोटी रुपये आणि एका पेंग्विनच्या देखरेखीसाठी 15 कोटी रुपये. काय प्राथमिकता आहे आज" अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

हेही वाचा: देश हादरवण्याच्या कटात जान महंमदचा सहभाग, राकेश अस्थाना मुंबईत

"हा बेशरमपणाचा कळस आहे. नवीन प्राणी संग्रहालय सुरू झाल्यावर फी वाढली. पेग्विन मुळे कमाई वाढत असेल तर खर्च कमी करा. प्रत्येक वॉर्डात आणि कार्यालयात पेंग्विन ठेवा. पेंग्विन उत्सव सुरू करा" अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

loading image
go to top