esakal | देश हादरवण्याच्या कटात जान महंमदचा सहभाग, राकेश अस्थाना मुंबईत
sakal

बोलून बातमी शोधा

देश हादरवण्याच्या कटात जान महंमदचा सहभाग, राकेश अस्थाना मुंबईत

देश हादरवण्याच्या कटात जान महंमदचा सहभाग, राकेश अस्थाना मुंबईत

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: पोलिसांच्या विशेष विभागाने मंगळवारी दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळून लावत सहा जणांना अटक केली. यामध्ये मुंबईच्या जान महंमद शेख ऊर्फ समीर कलिया (वय ४७) (jan mohammad) याचाही समावेश आहे. जान महंमद शेख हा सायनमध्ये (sion) राहतो. सहा राज्यात एकाच वेळी 15 स्फोट घडवून आणण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखला (terror plot) होता. या कटात मुंबईचा एक जण सहभागी असल्याचे समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दल (Mumbai police) खडबून जागे झाले आहे.

या प्रकरणात वेगाने घडामोडी घडत आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना हे देखील मुंबईत असल्याची सुत्रांची माहिती आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांसोबत वरिष्ठ अधिकारीही आहेत. कालच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा दहशतवाद्यांना अटक केली. त्यातील एक जण मुंबईतला आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस आयुक्त मुंबईत असण्याला महत्व प्राप्त झालंय. सुत्रांच्या माहितीनुसार एका वेगळ्या कामासाठी दिल्ली पोलीस आयुक्त मुंबईत आले आहेत.

हेही वाचा: इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात रामसेतू; तर कला शाखेसाठी रामचरितमानस

महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिस सतर्क झाले असून आणखी शोध घेत आहेत. मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांनी जान महंमद शेख याच्या कुटुंबियांची चौकशी केली. यावेळी अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. जान मोहम्मद सोमवार सायंकांळपर्यंत मुंबईतच होता. त्यानंतर त्यानं पत्नीला उत्तर प्रदेशला जातो म्हणून घर सोडलं. पत्नीला खात्री पटावी महणून मोबाइलमध्ये तिकिटही दाखवलं होतं. तसेच स्नॅपडील या कंपनीत आपण कामाला असल्याचे पत्नीला जान मंहमद याने सांगितलं होतं.

loading image
go to top