लोकं अडचणीत आहेत, तुम्ही प्रसिद्धीसाठी भिकारी!

मुरलीधर दळवी
बुधवार, 22 एप्रिल 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व व्यवहार, छोटे-मोठे उद्योगधंदे ठप्प झाल्याने रोजंदारीवर काम करणारे गोरगरीब मजूर, कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत असले तरी काही मंडळी केवळ फोटोसेशन करण्यात धन्यता मानत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक तसेच इतर समाजमाध्यमांवर याबाबतचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. यालाच कंटाळून, 'लोकं अडचणीत आहेत, तुमच्यासारखे प्रसिद्धीसाठी भिकारी नाहीत', अशा शब्दात मुरबाडमधील (जि. ठाणे) एका तरुणाने आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत

मुरबाड (ठाणे) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व व्यवहार, छोटे-मोठे उद्योगधंदे ठप्प झाल्याने रोजंदारीवर काम करणारे गोरगरीब मजूर, कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत असले तरी काही मंडळी केवळ फोटोसेशन करण्यात धन्यता मानत आहेत.

व्हॉट्सअॅप, फेसबुक तसेच इतर समाजमाध्यमांवर याबाबतचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. यालाच कंटाळून, 'लोकं अडचणीत आहेत, तुमच्यासारखे प्रसिद्धीसाठी भिकारी नाहीत', अशा शब्दात मुरबाडमधील (जि. ठाणे) एका तरुणाने आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत

क्लिक करा : शहापुरातील 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह

हा तरुण म्हणतोय, राजकीय मंडळींकडून गोर-गरीब जनतेला अन्नधान्य किंवा तत्सम गरजू वस्तू, किराणा सामानाचे वाटप केले जात आहे, त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार देखील. परंतु या कठीण प्रसंगात तुम्ही दाखवत असलेल्या उदार मनाचा "स्वार्थ" तुम्हाला काही लपवून ठेवता येत नाही. चार कांदे, चार बटाटे वाटपासाठी सफेद, कडक इस्त्रीचे कपडे घालून दहा-बारा "चमकू" नेते फोटो काढताना अशा पोझ देत असतात की, जसं काय मोठ्या लग्न समारंभाला आले आहेत.

क्लिक करा : खोपोलीत 28 दिवसांसाठी क्वारंटाईन केलेले जोडपे पळाले

लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पुढारी म्हणून जनतेप्रती तुमची कर्तव्ये बजावताना जरा परिस्थितीचे भान सुद्धा बाळगत जा. तुमच्या चेल्या-चपट्यांकडून व्हायरल होणाऱ्या फोटोंचा विट आलाय...लक्षात ठेवा, लोकं अडचणीत आहेत, तुमच्यासारखे प्रसिद्धीसाठी भिकारी नाहीत, अशा शब्दात तरुणाने आपल्या भावना व्हॉटसअपवरून व्यक्त केल्या आहेत.
    
कोरोना महामारीच्या काळात मतदार जनतेच्या गरजा जाणून न घेणाऱ्या आमदार-खासदारांची फेसबुकवर चांगलीच खरडपट्टी काढणारी तरुणी गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. एरव्ही मदतानाच्या वेळी दारोदार मत मागण्यासाठी फिरणारे लोकप्रतिनिधी आता गरजेच्या वेळी गोरगरीबांची साधी विचारपूसही करत नसल्याबद्दल या तरुणीने प्रचंड चीड व्यक्त केली आहे.

या तरुणीचा फेसबुक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना मुरबाडमधील तरुणानेही चमकेगिरी करणाऱ्या या 'व्हाईट कॉलर' नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. त्याचा हा मेसेजही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People are in trouble, Netas are beggars for famous