बाप रे ! दुबईहून आलेले प्रवासी दहा तास मुंबई विमानतळावरच; सोशल डिस्टंसिंगकडेही दुर्लक्ष.. 

vande bharat mission
vande bharat mission

मुंबई : विमान मुंबईत लँड झाल्यावर त्यातील प्रवाशांना दहा तास विमानतळावरच थांबणे भाग पडले असल्याची दावा करण्यात आला आहे. एमिरेटस््च्या विमानाने दुबईहून आलेल्या प्रवाशांवर ही वेळ आली असल्याचे वृत्त आहे.

दुबईहून आलेले विमान मुंबईत सकाळी 8 वाजता लँड झाले, पण त्यानंतर त्यांना तीन तासात विमानात थांबवण्यात आले. डि बोर्डिंग झाल्यावर त्यांना एका हॉलमध्ये चार तास बसवण्यात आले. 

त्यानंतर इमिग्रेशन आणि अन्य उपचार सुरु झाले. अखेर सक्तीच्या विलगीकरणासाठी वाशीतील हॉटेलसाठी ते संध्याकाळी दहा वाजता रवाना झाले. डि-बोर्डिंग झाल्यावर त्यांना विमानतळावर काहीही खाण्यास देण्यात आले नाही, असाही दावा काही प्रवाशांनी केल आहे. वाशीतील हॉटेलच्या रुमचे भाडे खूपच जास्त असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केल्यावर त्यांचे विलगीकरण ठाण्यातील हयटेलमध्ये करण्याचे ठरले. 

आरोग्य आधिकारी नसल्याचे कारण देत आम्हाला विमानात सव्वा अकरापर्यंत थांबण्यास सांगण्यात आले. विमानातून बाहेर आल्यावर आमचे कोणतेही स्क्रीनिंग झाले नाही. कोणत्याही चाचणीविनाच आम्ही विमानतळाच्या कक्षात आलो, असे ठाण्यातील अनिश राणे यांनी सांगितल्याचेही म्हंटले आहे. 

विमानातून प्रवासी डी बोर्डिंग झाल्यावर ते स्क्रीनिंग काऊंटरच्या येथे जातात. तिथे त्यांचे तपमान अत्याधुनिक यंत्रणेच्या मार्फत तपासले जाते. थर्मल कॅमेऱ्यांच्या मदतीने ही तपासणी होते, असे विमानतळावरील आरोग्य आधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी आता थर्मोमीटरने पूर्वीसारखी तपासणी होत नाही. 

प्रवासी स्क्रीनिंग काऊंटरवर आल्यावर ते फॉर्म सादर करतात. त्याची एक प्रत प्रवाशांना देण्यात येते. त्यानंतर ते इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करतात, असेही या आधिकाऱ्यांनी सांगितल्याचे म्हंटले आहे.  स्क्रीनिंग काऊंटरवरील गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांना विमानात बसवणे भाग पडले होते, असेही आधिकाऱ्यांनी सांगितल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, काही प्रवाशांनी रांगेत अनेकांनी सुरक्षित अंतराचे पालन केले नसल्याचेही सांगितले.

संपादन : अथर्व महांकाळ 

people came from dubai stay at airport for nearly 10 hours 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com