CSR उपक्रमांतर्गत एंडोस्कोपी सेवा; गरजू रुग्णांसाठी प्रगत चाचण्या | endoscopy test update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

endoscopy test

CSR उपक्रमांतर्गत एंडोस्कोपी सेवा; गरजू रुग्णांसाठी प्रगत चाचण्या

मुंबई : सामान्य लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी (people lifestyle improvement) एका खासगी रुग्णालय (Private hospital) आणि  आयसीआयसीआय फाउंडेशनच्या (ICICI Foundation) सहकार्याने गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात प्रगत एन्डोस्कोपिक चाचण्या (endoscopy test) करण्यात येणार आहेत. यात इसॉफगो गॅस्ट्रो ड्युओडेनोस्कोपी, कोलोनोस्कोपि, अँड एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड या प्रक्रिया असून हा उपकम आगामी दोन वर्ष सुरु राहणार आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (corporate social responsibility) उपक्रमातून सामाजिक दायित्व म्हणून या तपासण्या करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: 'नेत्यासोबत सेक्ससाठी मला भाग पाडलं', दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीचा खुलासा

यावर बोलताना झेन मल्टिस्पेशालिटीचे संचालक डॉ रॉय पाटणकर यांनी सांगितले की, कोविड संकट काळात सामाजिकदृष्ट्या जबाबदार राहणे अधिक गरजेचे आहे. कर्करोग आणि कर्करोगापूर्वीच्या स्थितीचे लवकर निदान करण्यासाठी सवलतीच्या दरात प्रगत एंडोस्कोपिक सेवा सुरु करण्यात येणार आहे. कोविड काळात जवळपास 25 रूग्ण हे अतिशय वाईट स्थितीत रूग्णालयात आणले गेले. रक्ताच्या उलटया, कर्करोग संपूर्ण शरिरात पसरल्याचे दिसून आले तर गुदद्वारावाटे रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. हे सर्व उशीरा निदान झाल्यामुळे झाले.

म्हणून वंचित घटकांना ही सेवा सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यात एसोफॅगो-गॅस्ट्रो डुओडेनोस्कोपी, कोलोनोस्कोपी आणि एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड या काही प्रक्रिया असून आगामी दोन वर्षे हा उपकम सुरु ठेवण्यात येणार आहे. रिफ्लक्स, अन्न नलीकेचा अल्सर, आतडयाचा कर्करोग, पोटातील अल्सर यासह अॅसिडिटीच्या समस्यांचे निदान करण्यासाठी पहिली चाचणी करण्यात आली. पोटाचे विविध प्रकारचे कर्करोग आणि ट्यूमर, कोलोनिक कर्करोग आणि अल्सर, अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज, डायव्हर्टिकुलोसिस सारख्या क्रॉनिक अल्सरचे निदान करण्यासाठी कोलोनोस्कोपी केली जाते. एन्डोस्कोपिक अल्ट्रासाऊंड हे ड्युओडेनल कॅन्सर, स्वादुपिंड आणि  पित्तमार्गाच्या कर्करोगासाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले.

loading image
go to top