जीवनशैली आणि बिघडलेले आरोग्य कोरोना मृत्यूदर वाढवण्याचे प्रमुख कारण

जीवनशैली आणि बिघडलेले आरोग्य कोरोना मृत्यूदर वाढवण्याचे प्रमुख कारण

मुंबई: कोरोना मृत्यूदर वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांची जीवनशैली आणि बिघडलेले आरोग्य, असल्याचे मत राज्य टास्क फोर्स समितीने व्यक्त केले अहे. कोविड 19 मुळे आतापर्यंत शहरात जवळपास 10,739 लोकांचा मृत्यू झाला आहे त्यातील 55 टक्के लोकांना हायपर टेन्शन होतं तर 50 टक्के लोकांना मधुमेह होता. टास्क फोर्सच्या डॉक्टरांचे असं म्हणणं आहे की, शहराची जीवनशैली आणि शहरातील लोकांचे बिघडलेले आरोग्य हे त्यांच्या कमी आयुष्यमानाला जबाबदार आहे.

कोविड 19 मुळे मुंबईतील दगावलेल्या लोकांना इतर सहव्याधी जबाबदार आहे. मुंबईचा कोरोना व्हायरस मृत्यूदर हा दोन टक्के आहे जो देशाच्या तुलनेत अधिक आहे. देशाचा कोव्हिड 19 मुळे झालेला सरासरी मृत्यूदर हा 1.46 टक्के आहे. एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी ज्यांनी डायबिटीस वरच्या अनेक अभ्यासात सहभाग घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की, एकूण 10 हजार 739 मृत्यूंपैकी 55 टक्के लोकांचा मृत्यू हायपर टेन्शन मुळे तर 50 टक्के मधुमेहामुळे झालाय आणि कोविड 19 च्या उपचारांवर कोमॉरबिडीजचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, हायपर टेन्शनमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जगातील सगळ्यात जास्त लोकांचा मृत्यू हा हृदय विकारांमुळे होतो. तर डायबिटीस आणि स्ट्रोक यामुळे देखील मोठ्या प्रमाणात लोकांना जगभरात मृत्युमुखी पडावं लागतं. शहरातील १५ टक्के लोकसंख्या ही मधुमेहाने ग्रस्त आहे तर तीस टक्के लोक हायपरटेन्शनचे शिकार आहेत. खराब आरोग्यामुळे मुंबईकरांचं आयुष्य हे सात वर्षांनी कमी आहे. इतर शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्याच्या तुलनेत याचे मुख्य कारण म्हणजे कमी झोप झोप, जास्त त्रास घेणे, आरोग्यास हानिकारक असलेल्या खाण्याच्या सवयी आणि कमी व्यायाम. 

महामारीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पार पडलेल्या बैठकीत दहा टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोमॉरबिडीज रुग्णांवर लक्ष ठेवण्याची गरज बोलून दाखवली. हिवाळ्यात थंडीमुळे कोविडच्या मृत्यू दरात वाढ होऊ शकते हे सांगतानाच या डॉक्टरांनी 55 वर्षाच्या पुढे हायरिस्क लोकांना आणि कोमॉरबिडीज रुग्णांना सतत मॉनिटर करायची गरज असल्याचं सांगितलं.

यावेळी डॉक्टरांनी डायबिटीस असलेले, हायपर टेन्शन, लठ्ठपणाचा आणि अस्थमाचा त्रास असलेले लोक हे उशिरा किंवा गंभीर झाल्यानंतर औषधोपचार करण्यासाठी येत असल्याचं सांगितलं.

उशीर झाल्यावर रूग्णांचे प्राण वाचवणे कठीण होते. उशिरा वैद्यकीय मदत मिळाल्यानंतर ज्याप्रकारे मृत्यू दरात वाढ होते ती वाढ आतापर्यंतच्या कामावरती पाणी फिरू शकते असं डॉक्टर ओम श्रीवास्तव यांचं म्हणणं आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत कोविड 19 मुळे झालेला मृत्यू दर हा पाच टक्क्यांच्या जवळपास होता सप्टेंबर महिन्यात तो 4.4℅ वर आला, ऑक्टोबर मध्ये 3.9 होता आणि सध्या राज्याचा मृत्यू तर हा 2.6 टक्के आहे.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

People lifestyles impaired health increasing corona mortality Opinion Task Force Committee

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com