esakal | मुंबईतील इमारतींमध्ये कोरोनाचा फैलाव वाढतोय, दहा हजार इमारती अजूनही सिलचं
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील इमारतींमध्ये कोरोनाचा फैलाव वाढतोय, दहा हजार इमारती अजूनही सिलचं

इमारतींमधील रुग्णांची संख्या वाढतच असून सध्या 10 हजार 99 इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने इमारती सिल करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील इमारतींमध्ये कोरोनाचा फैलाव वाढतोय, दहा हजार इमारती अजूनही सिलचं

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : इमारतींमधील रुग्णांची संख्या वाढतच असून सध्या 10 हजार 99 इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने इमारती सिल करण्यात आल्या आहेत. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत 8 हजार 637 इमारती सिल होत्या. महिन्याभरात सिल इमारतीत राहाणाऱ्या नागरीकांची संख्या एक लाखाने वाढली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यानंतर इमारतींमधील रुग्ण वाढू लागले आहेत. सध्या सिल केलेल्या इमारतींमध्ये 10 लाख 50 हजार नागरीक राहात आहेत. तर 13 सप्टेंबर रोजी 8 हजार 637 इमारती सिल होत्या. त्यात, 9 लाख 40 नागरीक राहात होते. सप्टेंबर महिन्यापासून 70 टक्के रुग्ण हे इमारतींमध्ये आढळू लागले आहेत. पश्‍चिम उपनगरातील सर्वाधिक इमारती आतापर्यंत सिल करण्यात आल्या असून त्यात बोरीवली येथील 1316 इमारती आहेत. प्रतिबंधीत वस्त्यांची संख्या ऑगस्ट पासून 600 ते 650 दरम्यानच आहे.तर,आता 643 वस्त्या सिल असून त्यात 31 लाख 10 हजार नागरीक राहात आहेत.

महत्त्वाची बातमी : बिहार निवडणूक 2020: शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढता येण्याची शक्यता कमी

शहर विभागातून फक्त एफ उत्तर म्हणजे दादर पुर्व, माटुंगा  शिव या भागातील 831 इमारती सिल आहेत. या प्रभागात चौथ्या क्रमाकांच्या इमारती सिल आहेत. तर, मालाड पी उत्तर प्रभागात 699 इमारती सिल आहेत.

21 टक्के इमारती कांदिवली बोरीवलीत

  • बोरीवली आर मध्य प्रभागात सर्वाधिक इमारती सिल आहेत.
  • त्याखालोखाल कांदिवली आर दक्षिण प्रभागात 831 सिल करण्यात आल्या आहे.
  • शहरातील एकूण सिल इमारतींपैकी 21 टक्के इमारती बोरीवली आणि कांदिवली येथील आहेत.
  • तर, दहिसरमध्ये शहरातील सर्वाधिक 65 वस्त्या सिल आहेत.

महत्त्वाची बातमी :  डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणः तिन्ही आरोपींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

अंधेरी, जोगेश्‍वरी अलर्टवर

अंधेरी जोगेश्‍वरी पुर्व के पुर्व परीसरातील 56 वस्त्या आणि अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम के पश्‍चिम येथील 41 वस्त्यांमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने या वस्त्या प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत. तर, के पश्‍चिम प्रभागातील 816 इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढलल्याने त्या इमारती सिल करण्यात आल्या आहेत.

पुर्व उपनगरातील मुलूंड भांडूप विक्रोळी या परीसरातील वस्त्यांमध्ये कोविडचे रुग्ण आढळत आहेत. विक्रोळी भांडूप एस प्रभागातील 64 वस्त्या सिल आहेत. तर, मुलूंड टी प्रभागात 41 वस्त्या सिल आहेत.

people staying in buildings are getting corona more than ten thousand buildings are sealed

loading image