जन आंदोलनाच्या धसक्‍यामुळे आज अंधेरी चार बंगला परीसरातील कुटुंबांना हक्काचे पाणी मिळाले आहे. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Strike in mumbai

मुंबईतील जन आंदोलनाचा धसका; चार रखडलेली जलजोडणी देण्याचं BMC चं आश्वासन

मुंबई : जन आंदोलनाच्या (people strike) धसक्‍यामुळे आज अंधेरी (Andheri) चार बंगला परीसरातील कुटूंबांना हक्काचे पाणी मिळाले आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी जलवाहीनीसाठी (water pipeline) अनामत रक्कम (Deposit) भरलेली असतानाही जलजोडणी दिली जात नव्हती. अखेरीस आज येथील 800 कुटुंबं आंदोलनासाठी रस्त्यावर उतरताच 15 दिवसात जलजोडणी बाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन महानगरपालिकेने (BMC) दिले.

महानगर पालिकेने सर्वांना जलजोडणी देण्याचा ठराव 2016 मध्ये केला.अंधेरी चार बंगला परीसरात असलेल्या सिध्दार्थ नगर येथील 800 कुटूंबांनी यासाठी 2018 मध्ये अधिकृत जलजोडणी मिळण्यासाठी प्रत्येकी 3 हजार रुपयांची अनामत रक्कम भरली.मात्र,अद्याप त्यांना जलजोडणी मिळाली नव्हती.वारंवार विनंती,अर्ज करुनही पालिकेच्या के पश्‍चिम प्रभागा कार्यालया मार्फत दाद दिली जात नव्हती. त्यामुळे आज अखेरीस पाणी हक्क समितीच्या मदतीने या रहिवाशांनी जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला. येथील जवळील जलवाहीनीतून जलजोडणी घेण्याचा निर्णय घेतला.

तसेच नंतर किरकोळ दंड भरुनही जलजोडणी अधिकृतही करण्यात येणार होती.आंदोलनाची सुरवात होताच पोलिसांच्या मध्यस्थीने के पश्‍चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण व जलकामे आणि परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंतांआणि शिष्टमंडळासोबत बैठक झाली.या बैठकीत पालिकेकडून तत्काळ प्रशासकीय मंजूरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असून 15 दिवसात याबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.

...तर कुटुंबांसह आयुक्तांची भेट

स्थानिक प्रशासनाने जलजोडणी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र,जलजोडणी न मिळाल्यास हे आंदोनल अधिक तिव्र करुन पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांच्या भेटीसाठी मुलाबाळांसह जाऊ असा इशारा देण्यात आला.

loading image
go to top