चाकरमान्यांनो गावी जाताय ? गावी जाताना शिदोरी सोबतच ठेवा, नाहीतर... 

समीर सुर्वे
Thursday, 6 August 2020

कोरोनामुळे गणपतीसाठी यंदा 7 ते 14 दिवस अगोदर गावी जावे लागणार आहे. त्यासाठी आता पासूनच मुंबई गोवा मार्गावर वाहानांची गर्दी होऊ लागली.

मुंबई : गणपतीसाठी गावी जाण्यास चाकरमान्यांची सुरुवात झाली आहे. मात्र, यंदाचा प्रवास नेहमी सारखा सोप्पा नाही. तुफान पाऊस  त्यातच लॉकडाऊन मुळे हॉटेल्स पासून किरकोळ दुकानेही तुरळक उघडी असल्याने सोबत शिदोरी घेऊन गेलेलं बरं.

कोरोनामुळे गणपतीसाठी यंदा 7 ते 14 दिवस अगोदर गावी जावे लागणार आहे. त्यासाठी आता पासूनच मुंबई गोवा मार्गावर वाहानांची गर्दी होऊ लागली. त्यात अतिवृष्टीमुळे  ठिक-ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून पुढील दोन तीन दिवस असाच पाऊस राहाणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

त्याचबरोबर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बहूसंख्य हॉटेल्स बंद असल्याने खाण्यापिण्याचे चांगलेच वांदे होऊ शकतात. त्यामुळे सोबत जेवणाचा डबा, पाणी ठेवणे गरजेचे आहे. हॉटेल्स बंद असल्याने स्वच्छतागृहांची उपलब्धताही कमीच आहे.

BIG NEWS : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

प्रवास करता 'हे' लक्षात ठेवा 

  • शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा - जोरदार पावसामुळे सध्या तरी रात्रीचा प्रवास टाळलेलाच बरा.
  • मास्क सॅनिटायझर - कोरोनामुळे प्रवासात मास्क वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान सोबत सॅनिटायझरही ठेवावे. त्याचा वारंवार वापरही करावा. 
  • क्वारंटाईनची तयारी - गावी पोहचल्यावर सात ते 14 दिवस घरातून बाहेर पडता येणार नाही. त्यासाठी क्वारंटाईनची मानसिक तयारी करुन ठेवावी.
  • आवश्यक साहित्य सोबत ठेवा - गावांमधिल व्यवहारही अद्याप पुर्ण क्षमतेने सुरु झालेलेे नाहीत. त्यामुळे जिवनावश्यक साहित्य मुंबईतूनच घेऊन जाणे योग्य ठरेल.

people who are travelling for ganeshotsav these days are requested to carry their own food

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people who are travelling for ganeshotsav these days are requested to carry their own food