जनतेला अपेक्षित विकास साधणार;प्रशांत ठाकूर

सकाळ वृत्‍तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

‘कॉफी विथ सकाळ’मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दिलखुलास गप्पा

विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा 
पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री विषद केली.  या वेळी त्यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. ज्या पक्षाने ग्रामीणच नाही, तर शहरी मतदारांचा भ्रमनिरास केला. अशा पक्षावर विश्‍वास कोण ठेवणार? असा टोला शेकापला लगावला. कर्नाळा बँकेच्या सर्व व्यवहारांच्या चौकशीसाठी ग्राहकांना बळ देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

कोणत्या पायभूत सुविधांना प्राधान्य देणार?
शहरी भागातदेखील विकासाच्या सिडकोने दिलेली आश्वासने पूर्ण झाली पाहिजेत. उद्याने, बगिचे, रस्ते, मैदाने, ज्येष्ठांना बसण्यासाठी विरंगुळा केंद्र, धावपट्टी, समाज कार्यालय, फेरीवाल्यांसाठी मार्केट इमारत, शहरातील अनेक रस्ते फेरीवालामुक्त करून त्यांना दुसऱ्या जागांवर बसवले आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मिळायला हव्या आहेत. सरकारी रुग्णालय, न्यायालय इमारत, अशा सर्व सुविधांयुक्त हे शहर झाले पाहिजे, असा पाठपुरावा आम्ही करीत आहोत. आर्थिकदृष्ट्या भक्कम असणारे प्रकल्प महापालिकेतर्फे उभारले जाण्याचा प्रयत्न आहे. कचऱ्यासारखा प्रकल्प, जाहिरात प्रकल्प जसे अर्थसहाय्य उभे केले जात असतील, असे प्रकल्प भविष्यात उभारण्याचा आमचा मानस आहे. यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना स्वतःसाठी काम करायचे नाही, असे आम्ही निश्‍चित केले होते; परंतु आमच्यावर टीका करणाऱ्यांना काळाने उत्तर दिले आहे.
 

भाजप आणि इतर पक्षांमध्ये कोणता फरक जाणवतो? 
भाजपचे काम मला माहीत नव्हते; पण जेव्हा आम्ही नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे पाहिली, पक्ष संघटन आणि सरकारने केलेल्या कामांची अंमलबजावणी यात खूप फरक दिसला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सुट्टी न घेता काम करतात. स्वतःच्या परिवाराचा विचार न करणे हे सर्व त्यांच्या दैनंदिन कामातून दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास जे चुकीचे दिसले, ते त्यांनी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केला. ज्या पक्षात मी काम करतो, त्या पक्षाची जमिनीवर राहून लोकांची कामे करणे अशी शिकवण आहे. प्रजा हीच राजा, असे आमचे मुख्यमंत्री सांगतात. त्यानुसार काम केले जाईल. माझ्या विरोधातील उमेदवाराच्या पक्षाने लोकांचा भ्रमनिरास केला आहे. कळंबोली, कामोठे, खारघर या ग्रामपंचायती शेकापच्या ताब्यात होत्या; परंतु महापालिकेला खारघर ग्रामपंचायतीनेच विरोध केला होता. ग्रामपंचायतींने जाणीवपूर्वक विरोध केला होता. विकासाला विरोध आहे. विकास व्हावा तो माझ्या ओंजळीतून व्हावा. ते नेते आता बाजूला झाल्यामुळे तो पक्ष व नेते लोकांच्या मनातून उतरत आहेत. या परिस्थितीत अशा लोकांच्या आधारावर साडेपाच लाखांची मतदार संख्या असलेली निवडणूक लढवली जाऊ शकत नाही. नागरिकांचे जीवनमान उंचावणार. पनवेलसाठी रस्ते, गटारे, पाणी अशा चांगल्या सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल, अशा सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. खारघरमध्ये होणारे कलाकेंद्र आदि प्रत्येक वयोगटातील लोकांना हे शहर आपलेसे वाटावे, याकरिता प्रकल्प राबवायचे आहेत.
 

कर्नाळा बॅंकेबाबत भूमिका काय आहे? 
कर्नाळा बॅंकेच्या परिस्थितीमुळे अनेक ग्राहक वैतागलेले आहे. शिक्षणासाठी, लग्नासाठी गुंतवलेले पैसे मिळत नसल्याने अनेक ग्राहक कंटाळलेले आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बॅंक असल्यामुळे अनेकांना चांगले गुंतवलेल्या ठेवी लोकांना परत कधी मिळणार, असा प्रश्न लोकांना पडला आहे. तेव्हा लोक आमच्याकडे आले. आम्ही यात लक्ष घातल्यास पुन्हा राजकीय वळण दिले जाईल, म्हणून त्यात पडू नये, असे काहींनी सांगितले; मात्र त्याच्या उलट असे झाले, की ज्या लोकांना दमदाटी केली गेली ते शेकापचेच लोक निघाले. तेव्हा लोकांसमोर परिस्थिती आली. जमिनीच्या विक्रीतून शेतकऱ्यांना मिळालेली रक्‍कम त्यांनी बॅंकेत ठेवली. गेला महिनाभर बॅंकेचे चेअरमन लोकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. याबाबत आम्ही जर गप्प राहिलो, तर आपण लोकांना प्रतिसाद देत नाही, असा अर्थ होईल. त्याकरिता पाऊल पुढे टाकल्यावर लोकांनी पुढे येऊन तक्रारी दाखल केल्या. जर तक्रार केली, तर पैसे मिळणार नाही, अशी भीती ग्राहकांमध्ये आहे. किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेत तक्रार करणाऱ्या ग्राहकाला एका पत्रकाराने सांगितले की, तू आता तक्रार केलीस. आता पैसे मिळणार नाही.

विकासासाठी मंत्रीपद किती महत्त्वाचे? 
सिडकोच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून एक मोठी जबाबदारी पार पाडत आहे. पूर्वी फक्त पाहण्याइतके काम होते; परंतु आता एक भागीदार म्हणून काम करीत आहे. सिडकोच्या माध्यमातून नागरिकांना प्रशासकीय कामांमध्ये सुसूत्रता आणून चांगल्या सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. सिडको हे एक महामंडळ आहे; पण त्याला राज्यमंत्रिपदापेक्षा कमी नाही. भाजपममध्ये मंत्र्यांना फारशी किंमत नाही; मात्र एक आमदार म्हणून जास्त अधिकार माझ्याकडे आहेत. त्याचा फायदा जास्तीत जास्त जनतेला होण्यासाठी काम करेन. माझ्यावर असलेल्या जबाबदारीने मी समाधानी आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी स्वीकारेन.

शेकाप बद्दल काय सांगाल? 
अनेक वर्षांपासून त्यांचेच आमदार येथे होऊन गेले; मात्र त्यांची कार्यशैली येथील लोकांना पटलेली नाही. आरे ला कारे म्हणणारे नेतृत्व येथे नव्हते. म्हणून ते दीर्घकाळापर्यंत चालून राहिले. ज्यांना पटले नाही ते दूर गेले. त्यामुळे शेकापचे महत्त्व कमी होत गेले. आम्ही ते सातत्य राखले म्हणून शेकापचे मतदारांवरील प्रभाव संपला. ज्या कार्यकर्त्यांना वाटले आपले नेते फसवतात, असे ते पदाधिकारी आता भाजपमध्ये येत आहेत. उमेदवार कोण आहे, यापेक्षा तो कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहून आम्ही काम करतो. 

पाणीसमस्या गंभीर.. पण तोडगा निघालाय
सिडकोचे अध्यक्षपद माझ्याकडे आल्यावर असे लक्षात आले की पाण्याचे स्रोत कमी आहेत. तसेच जे नियोजन झाले आहे, ते पाण्याच्या यशस्वितेनुसार केले आहे. सिडको हेटवणेतून पाणी आणते; पण पाण्याची मागणी वाढल्यावर सध्या सिडको नवी मुंबई महापालिकेकडून पाणी घेते. त्याचे नियोजन सिडकोने आधी केले नव्हते. पाताळगंगा धरणातून एमजेपीद्वारे आणले जाणारे पाणी ज्या जलवाहिनीतून आणले जाते, ती अतिशय जीर्ण झाली आहे. तब्बल २ कोटी लिटर पाणी रोज वाया जात आहे. त्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी २००९ पासून पाठपुरावा करीत आहे. ही दुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेने तयारी दाखवली होती; मात्र त्या वेळी जेएनपीटीने खर्चाच्या बाबीवरून नकार दिला. त्यानंतर सिडको व पालिकेने नकार दिला. तसेच कोणत्या कर्जाची गरज नाही, असे सरकारी प्राधिकरणाने सरकारला कळविल्यामुळे अमृत योजनेतून मिळणाऱ्या अर्थसहाय्यात दिरंगाई झाली. हेटवणेतून ज्या जलवाहिनीतून खारघरला पाणी येते, त्या जलवाहिनीवरील दहा किलोमीटरची जलवाहिनी सिमेंटची आहे. जितेजवळ पाणी शुद्धीकरण केले जाते. सिडको अध्यक्ष झाल्यापासून बैठका व पाठपुरावा घेत जलवाहिनी तयार करण्याचे काम आहे. पण ज्या सोसायटीला चांगल्या दाबाने पाणी मिळत नसेल, त्या संबंधित सोसायटीला सिडकोने अपेक्षित दाबानुसार पाणीपुरवठा करायचा, असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार सिडकोच्या जबाबदारीने ते काम केले आहे. तसेच ओव्याचे धरण, तळोजा एमआयडीसीला देण्यात येणारे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People will expect development; Prashant Thakur