
मुंबई - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेल्या 5 महिन्यापासून एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद होती. त्यापैकी आंतरजिल्हा बससेवा गुरुवार पासुन (20 ऑगस्ट) पासून सुरु होणार आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल असही ते म्हणाले
गुरुवारपासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरु होत आहे. त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई - पासची आवश्यकता नाही. मात्र प्रवासादरम्यान प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या कोविड - 19 च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
23 मार्चपासून कोरोना महामारीमुळे मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद होती. मात्र या काळात एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले. कोल्हापूर - सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोजडे. 22 मे पासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली आहे. त्याद्वारे दररोज सुमारे 1300 बसेसमधून सरासरी 7287 फेऱ्यातून अंदाजे दीड लाख प्रवाशांना सेवा पुरवली आहे.
----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.