
मुंबई : वसईच्या सर्वात मोठ्या सेंट कार्डिनल ग्रेसीयस हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला असुन या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या स्टाफला क्वारंटाईन करण्यात येणार आहे. सध्या या रुग्णालयात कोणालाही दाखल करुन घेतलं जात नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वसई शहरातील कार्डिनल ग्रेसीयस मेमोरियल हॉस्पिटल हे 100 खाटांचे हॉस्पिटल असुन सर्वात जास्त गर्दीचे हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. दीडशे डॉक्टर, 200 नर्सेससह एकुण 750 कर्मचारी कार्यरत आहेत.
काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते. त्यापैकी एक 60 वर्षीय व्यक्ती उपचारांसाठी दाखल झाली होती. त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. पण, दुसर्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अनेक कर्मचार्याना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. शिवाय, दुसरा कोरोना रूग्णाला रिध्दीविनायक रुग्णालयात ट्रान्सफार्म करण्यात आले असल्याची माहिती रूग्णालयाच्या जनरल मॅनेजर फ्लोरी यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी 2 रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 60 वर्षीय एका व्यक्तिचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.तपासणीनंतर हा व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले. त्यानंतर अजुन एक व्यक्ती आली ती ही कोरोना पॉझिटीव्ह होती. दुसऱ्या रुग्णाला नालासोपाऱ्यातील रिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, रुग्णालयातील 15 कर्मचार्याना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. हे कर्मचारी या दोन्ही रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामूळे, खबरदारी म्हणून यांना क्वारंटाईन केले गेले आहे. सध्या रुग्णालय सील करण्याचा काही विचार नाही.
person in saint cardinal hospital passes away due to covid19
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.