

Peshwa-Era Cannons On MalangGad
ESakal
डोंबिवली : किल्ले श्री मलंगगड येथील पेशवेकालीन तोफा व तोफगोळे नेमके कोणाच्या ताब्यात होते आणि ते कोणत्या अधिकाराने ठेवण्यात आले होते, याबाबत सकल हिंदू समाजाने राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणाच्या प्रशासकीय चौकशीला वेग आला असतानाच १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी या तोफा पुन्हा श्री मलंग मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिराच्या प्रांगणात दिसून आल्या.