esakal | लॉकडाऊनमध्ये मुंबईतील आरे परिसरात चाललंय काय ?
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनमध्ये मुंबईतील आरे परिसरात चाललंय काय ?

लॉकडाऊन असतानाही आरे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि आग लागण्याच्या घटना घडत आहेत, असा आरोप जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये मुंबईतील आरे परिसरात चाललंय काय ?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊन असतानाही आरे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि आग लागण्याच्या घटना घडत आहेत, असा आरोप जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे. याबाबत खुलासा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

मेट्रो प्रकल्पासाठी गोरेगाव येथील आरे परिसरात कारशेडचे काम सुरू करण्यात आले होते. या कामाला तूर्तास अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतरही तेथे झाडे तोडण्यात येत असल्याचा आरोप वनशक्ती संस्थेने याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी न्या. अरुण मिश्रा आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. 

मोठी बातमी -  हे असंच होतं राहिलं तर एकेदिवशी लोकं नक्की म्हणतील, आम्हाला कोरोना परत द्या..., वाचा काय झालंय...

लॉकडाऊनमध्ये जंगलातील झाडे कापण्यात येत असून, पोलिस तक्रारी करण्यात आल्या आहेत. जंगलात आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु, आगीशी संबंधित तक्रारी पोलिस नोंदवून घत नाहीत. त्या तक्रारी राज्य राखीव पोलिस दलाच्या अखत्यारीत येतात, असे याचिकादारांच्या वकील ॲड्. अनिता शेणॉय यांनी सांगितले. या घटनांबाबत गंभीर कारवाई करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले. आरे वन प्राधिकरणने वृक्षतोडीविरोधात केलेल्या कारवाईचा अहवाल सहा आठवड्यांत दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. 
आरे वसाहतीत मेट्रो कारशेड उभारण्याच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी मोठे आंदोलन उभारले होते. त्यानंतर वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आली होती.

petition filed to check weather there is additional tree slaughter in aarey aarey