हे असंच होतं राहिलं तर एकेदिवशी लोकं नक्की म्हणतील, आम्हाला कोरोना परत द्या..., वाचा काय झालंय...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

कोरोनाग्रस्त सुरेखा साळुंखे व त्यांचा मुलगा दिगंबर साळुंखे यांच्यावर उपचारासाठी बोरीवलीतील ऍपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होत.

मुंबई : कोरोना संसर्गामुळे बोरीवली पश्चिम येथील एका नामांकित रूग्णालयात दाखल केलेल्या आई आणि मुलगा यांच्यावर 10 दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्या हातात तब्बल 4 लाख 70 हजार रूपयांचे देयक थोपवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. मात्र स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने या देयकात रूग्णालय प्रशासनाने अर्धी कपात केल्याने कोरोनाग्रस्त रूग्णांना मोठा दिलासा मिळाला.

मोठी बातमी सुशांतच्या आत्महत्येच्या चौकशीबाबत गृहमंत्र्यांनी दिली मोठी माहिती...

कोरोनाग्रस्त सुरेखा साळुंखे व त्यांचा मुलगा दिगंबर साळुंखे यांच्यावर उपचारासाठी बोरीवलीतील ऍपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. त्यांच्यावर दहा दिवस उपचार केल्यानंतर रूग्णालयाने त्यांना तब्बल 4 लाख 70 हजारांचे देयक दिले. या देयकामध्ये पीपीई कीट, एन-95 मास्क व जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणे यांसाठी एकूण 2 लाख 78 हजार रुपये लावण्यात आले होते.

याबाबत मनसेचे विभाग अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर कांबळे यांनी ऍपेक्स रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकारच्या अधिनियमाप्रमाणे निश्चित केलेल्या उपचार दर आकारण्याचा आग्रह धरला. त्यानंतर अंतिम देयकाची रक्कम 2 लाख 28 हजार रुपये एवढी करण्यात आली. मनसे पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे रुग्णालयाने देयकाच्या निम्मी रक्कम कमी करून दिल्याबद्दल रुग्णांनी मनसेचे आभार मानले आहे.

मोठी बातमी - पालघर प्रकरणातील २३ आरोपींना ठेवण्यात आलेलं वाडा पोलिस ठाणेच बंद करायची आली वेळ, कारण...

राज्य सरकार तसेच प्रशासनाचे दुर्लक्षामुळे वा हलगर्जीपणामुळेच सध्या खासगी डॉक्टर व रूग्णालय व्यवस्थापनांकडून सामान्य रुग्णांकडून अतिरिक्त देयकाद्वारे गैरफायदा घेण्यात येत आहे. यावर आळा बसलाच पाहिजे हेच आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. - हेमंतकुमार कांबळे, मनसे विभाग अध्यक्ष

for ten days patient was admitted in hospital and gets bill worth four lakh seventy thousand


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for ten days patient was admitted in hospital and gets bill worth four lakh seventy thousand