Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Mumbai High Court: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पीओपी मूर्तींवरील बंदी घालण्याच्या निर्णयाचे समर्थन करत याचिकाकर्त्यांनी न्यायालयात युक्तिवाद केल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai High Court

Mumbai High Court

ESakal

Updated on

मुंबई : सर्वसामांन्याचे हित, कल्याण हाच सर्वोच्च कायदा आहे. माझे श्रद्धा ठेवणाऱ्यांना आवाहन आहे, की वैयक्तिक हितासोबत समाजहितांचे रक्षण करा. सर्व काही प्रदूषित झाले आहे. त्यामुळेच पृथ्वी आक्रोश करीत आहे. परिस्थिती पूर्ववत व्हायला अनेक दशकांचा काळ लागेल. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असा युक्तिवाद प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीवर बंदी घालण्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या याचिकादारांनी बुधवारी (ता. २२) उच्च न्यायालयात केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com