मुंबईसह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

तुषार सोनवणे
Saturday, 5 December 2020

देशात इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये विक्रमी नोंद झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये डिझेलचे दर 80 रुपयांच्या वर गेले आहे

मुंबई -  देशात इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये विक्रमी नोंद झाली आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये डिझेलचे दर 80 रुपयांच्या वर गेले आहे. काल सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांनी वाढ केली आहे. कोरोना काळात पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये होणार वाड ही सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

हेही वाचा - तळोजा MIDC तील कंपनीला आग; अग्निशमन दलातील जवानाचा गुदमरून मृत्यू

राज्यातील साधारण 19 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी 90 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईतदेखील या किंमती लवकरच 90 रुपयांच्या वर जाण्याची चिन्हे आहेत. मुंबईत डिझेलच्या 24 पैशांनी वाढून 79.66 रुपयांवर गेले आहे. तर पेट्रोलच्या किंमतीतही 20 पैशांनी वाढ झाली आहे. 

हेही वाचा - 'राहुल गांधींवर केलेल्या टीकेबाबत यशोमती ठाकूर कडाडल्या; महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर

राज्यातील परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यात डिझेलच्या किंमती 80 रुपये प्रति लिटरच्या वर गेल्या आहेत. राज्यात सर्वाधिक दर हे  परभणीत आहेत. परभणीत पेट्रोल च्या किंमती 91.95 रुपयांवर पोहचल्या आहेत. या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे

 

----------------------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol diesel prices Increase in the state including Mumbai