
मुंबई: मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी ६० हजार रुपये खर्च केले जाणार असून सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत केला जाणार आहे. त्यासाठीच्या परवानग्या येत्या ४५ दिवसांत घेऊन या महत्वांकांक्षी प्रकल्पाच्या कामाला दोन महिन्यांत कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी (ता.४) दिली.