

मुंबई : बोरीवली (पश्चिम) येथे सोमवारी (ता.८) रिक्षाचालकांसोबत आयोजित ‘चाय पे चर्चा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे दुपारी एल.टी. रोडवरील बच्छेलाल टी हाऊस येथे झालेल्या या संवादात सहभागी झाले. शेकडो रिक्षाचालकांनी या कार्यक्रमात हजेरी लावून समस्यांविषयी संवाद साधला.