नवी मुंबई :'शून्य प्लास्टिकची सुरुवात माझ्यापासून'

नवी मुंबईतील प्रत्येक विद्यार्थी म्हणणार
navi mumbai municipal
navi mumbai municipalsakal media
Updated on

वाशी : प्लास्टिकमुळे (plastic usage) पर्यावरणाची आणि मानवी जीवनाची होणारी हानी (environment and human loss) लक्षात घेता, प्लास्टिकच्या वापरावर प्रतिबंध आणणे आवश्यक आहे. याकरिता प्लास्टिक प्रतिबंधात्मक कायद्याची (plastic prevention act) प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता (public awareness) आणणे तितकेच गरजेचे आहे. यादृष्टीने उमलत्या वयातील मुलांवर प्लास्टिक प्रतिबंधाचे संस्कार करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने (navi mumbai municipal) जनजागृतीपर सकारात्मक पाऊल उचलले आहे.

navi mumbai municipal
बदलापूर : बांधकाम व्यावसायिकाकडून दहा लाखांची खंडणी घेणारे अटकेत

प्लास्टिक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मुलांचा सहभाग करून घेणारा ‘शून्य प्लास्टिकचा माझ्यापासूनच प्रारंभ’ हा अभिनव उपक्रम आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईतील महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये राबविला जात आहे. हार्ट फाऊंडेशन या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने या नावीन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून या अंतर्गत विद्यार्थ्यांनी चॉकलेटचे रॅपर्स, वेफर्सचे पॅकेट्स, वन टाइम युज प्लास्टिक बॅग्ज अशाप्रकारचा अविघटनशील प्लास्टिक कचरा हा एक लिटर पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बॉटलमध्ये एकत्र करून त्या बॉटल्स आपल्या शाळेमध्ये जमा करायच्या आहेत. महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा व्यवस्थापनांना या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनास अनुसरून शाळांकडून उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

प्लास्टिक प्रतिबंधाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या विशेष उपक्रमामध्ये ५० हजाराहून अधिक शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लाभेल असा विश्वास महापालिकेला आहे. मुलांच्या माध्यमातून त्यांचे कुटुंबीय व शेजारी यांच्यापर्यंतही प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांची माहिती पोहचणार आहे. उपक्रमात इयत्ता २ री ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला महापालिकेमार्फत आकर्षक प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे.

navi mumbai municipal
नवी मुंबई : पक्ष्यांची किलबिलाट गुंजतेय

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील आठही विभागांतील शाळांमधून सर्वाधिक वजनाच्या प्लास्टिक बॉटल्स जमा करणाऱ्या ८ शाळांना विभागीय 'झिरो प्लास्टिक वेस्ट स्‍कूल' पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. विभागनिहाय आठ पारितोषिकांव्यतिरिक्त संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्राकरिता 'झिरो प्लास्टिक वेस्ट स्‍कूल' सर्वोत्कृष्ट शाळेचे वैशिष्ट्यपूर्ण पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. जास्तीत जास्त वजनाच्या प्लास्टिक बॉटल्स जमा करणाऱ्या प्रत्येक विभागातील एका विद्यार्थ्यास 'झिरो प्लास्टिक वेस्ट चॅम्पियन वॉर्ड' तसेच महापालिका क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यास 'झिरो प्लास्टिक वेस्ट नवी मुंबई चॅम्पियन' या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

४ डिसेंबरपर्यंत २०२१ विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या प्लास्टिक बॉटल्स शाळेत जमा करावयाच्या असून ५ डिसेंबर रोजी त्या शाळांमधून महापालिकेमार्फत संकलित केल्या जातील. संकलित प्लास्टिक बॉटल्सचा उपयोग 'टाकाऊपासून टिकाऊ' या संकल्पनेअंतर्गत नवनिर्मितीसाठी केला जाणार आहे. उपक्रमाची अधिक माहिती समाजमाध्यमावर उपलब्ध असून यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com