esakal | किमान 'यांना' तरी लोकल प्रवास करू द्या; शिवसेना आमदाराची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

local train

किमान 'यांना' तरी लोकल प्रवास करू द्या; शिवसेना आमदाराची मागणी

sakal_logo
By
विराज भागवत

कोरोना आटोक्यात असूनही सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल अद्याप बंदच

मुंबई: परीक्षा आणि निकालांसोबत प्रवेश आदी प्रक्रिया करण्यासाठी किमान मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सरकारकडे एक पत्र लिहून केली. कायंदे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहले. कोरोनाचा धोका लक्षात घेता ट्रेन्स सर्वसामान्यांसाठी बंद आहेत याची कल्पना आहे. पण विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निकालासंबंधी काम करण्यासाठी तरी किमान लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली.

हेही वाचा: "हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"

मुंबई विद्यापीठाच्या मार्च २०२१ च्या विविध सत्राच्या परीक्षा सुरु आहेत व झालेल्या परीक्षांचे निकाल लावण्याचे महत्वपूर्ण काम सुरु आहे. व या कामासाठी प्राध्यापक, शिक्षक व इतर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती गरजेचे असते परंतु विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी नसल्यामुळे उपस्थिती अत्यंत कमी आहे. त्यात मुंबई विद्यापीठातील अनेक कर्मचारी बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार व पालघर भागातून येतात त्यामुळे या कर्मचाऱ्यांना रेल्वेने येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणूनच या कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी, अशी मागणी आमदार डॉ. कायंदे यांनी केली.

loading image