कृपया 'कांदा द्या', असा आग्रह करू नये!

कृपया 'कांदा द्या', असा आग्रह करू नये!

नवी मुंबई : वाशीत सर्वसामान्यांच्या आवाक्‍याच्या बाहेर गेलेल्या आणि फळापेक्षाही अधिक महागलेल्या कांद्याने खवय्यांचे वांदे केलेले आहेत. नवी मुंबईतील तुर्भे एपीएमसी (APMC) मार्केट रोडवर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये 'ग्राहकांना नम्र विनंती, कांदा मागण्यास आग्रह करू नये' अशा पाट्या दिसू लागल्या आहेत; तर काही हॉटेलमध्ये राईस प्लेटमध्ये कांद्याच्या कापांऐवजी किसलेला कोबी, मुळा व गाजराचे सॅलड देणे सुरू झाले आहे. 

आवक घटली, दर वाढले :

राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका हा कांद्याला अधिक प्रमाणात बसला आहे. मागील आठवड्यापासून नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. ओला कांदा बाजारात काही प्रमाणात असला तरी त्या कांद्यालादेखील शंभर रुपये मोजावे लागत आहे; तर सुका कांदा हा 150 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एपीएमसीत इजिप्तचा कांदादेखील दाखल झाला आहे; मात्र हादेखील कांदा तब्बल 120 रुपये किलोने विकला जात आहे.

हॉटेल व्यावसायिकांवर परिणाम :

कांदा महागल्याने त्याचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे. हॉटेलमध्ये खवय्यांना मिसळपासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत कांदा लागतो; मात्र आता तो महागल्याने जेवणावळीत कोबी, गाजर, मुळा यांनी जागा घेतली आहे. एपीएमसी मार्केटमधील सिग्नलजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये कांद्याचा आग्रह धरू नये असा फलक लावण्यात आला आहे. महागलेल्या कांद्यामुळे हॉटेल व्यावसायिकच नाही, तर खवय्यांच्या डोळ्यातदेखील पाणी आणले आहे. याबाबत हॉटेल व्यावसायिकाकडे विचारणा केली असता कांदा हा सर्वच जेवणात वापरला जातो, परंतु आता दर वाढल्याने पर्याय नसल्याने हा फलक लावण्यात आल्याचे सांगितले. 

WebTitle : please do not ask for onions board displayed on the hotel counter 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com