esakal | कठोर नियम, निर्जंतुकिकरणाचा खर्च, इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे कॅब चालकांवर उपासमारीची वेळ...
sakal

बोलून बातमी शोधा

कठोर नियम, निर्जंतुकिकरणाचा खर्च, इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे कॅब चालकांवर उपासमारीची वेळ...

कोरोना महामारीने आलेल्या लॉकडाऊनमुळे कोणावर काय वेळ येईल हे सांगता येत नाही. अॅपच्या आधारे आरक्षित होणाऱ्या कॅब चालकांवर आता नवी कामे शोधण्याची वेळ आली आहे. 

कठोर नियम, निर्जंतुकिकरणाचा खर्च, इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे कॅब चालकांवर उपासमारीची वेळ...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना महामारीने आलेल्या लॉकडाऊनमुळे कोणावर काय वेळ येईल हे सांगता येत नाही. अॅपच्या आधारे आरक्षित होणाऱ्या कॅब चालकांवर आता नवी कामे शोधण्याची वेळ आली आहे. 

कॅब कंपन्या आपल्या चालकांना पार्टनर संबोधीत होत्या, पण आता त्यांना कारसाठी घेतलेले कर्ज कसे फेडणार याची चिंता लागली आहे. अनेकांनी या कारमुळे उत्पन्न चांगले येत असल्याने कर्ज काढून ही कार घेतली, पण आता कार आपल्याजवळ ठेवणेही अवघड झाले आहे. या कार चालकांच्या कहाणी धक्कादायक आहेत. 

वाचा - मुंबईजवळचा 'हा' जिल्हा ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

कोंडल रेड्डीने चार वर्षापूर्वी घेतलेली कार विकली आहे. आता गावाकडे जाऊन ट्रॅक्टर चालवण्याचे काम करीत आहे. शाळा तर सध्या ऑनलाईन आहे. प्रत्यक्ष शाळा सुरु होईल, त्यावेळी परत शहरात परतून काम करता येईल हा त्याला विश्वास आहे. मुंबईतील अमजद खान नाशिकला जाणाऱ्या ट्रकवर हेल्पर म्हणून काम करीत आहे, त्याचे दिवसाला एक हजार मिळतात, असे तो सांगतो. पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट कमाई होत असे तो सांगतो. मात्र हा अपवादच म्हणायला हवा. काहींनी तर फळ आणि भाजी विकायला सुरुवात केली आहे. 

वाचा - मुंबईतल्या कोरोना संदर्भात आली मोठी अपडेट, जाणून घ्या

अनेक कार चालक अनलॉकमधील कठोर नियम, कमी होत जाणारी मागणी, सातत्याने कार निर्जंतुक करण्यासाठी होणारा खर्च तसेच इंधनाच्या वाढत्या भावाने प्रश्न जास्तच बिकट होत असल्याचे सांगतात.  उबेरने केलेली कपात, तसेच बंद केलेले मुंबई कार्यालय याचेच द्योतक असल्याचे सांगितले जात आहे. काही आर्थिक अभ्यासक अॅप आधारीत कार चालकांना उद्योजक मानले तर त्यांचे प्रश्न सुटण्यास काही प्रमाणात नक्कीच मदत होऊ शकेल. त्यांना सरकारच्या योजनेचा फायदाही मिळू शकेल असे सूचवत आहेत.

loading image